पाकिस्तानचा संघ प्रथम फलंदाजी करताना चांगल्या स्थितीत होता. मात्र भारतीय गोलंदाजांची कामगिरी चांगलीच पाहावयास मिळाली. टीम मधील प्रत्येकच गोलंदाजाला प्रत्येकी २ विकेट मिळाल्या त्यामुळे एकंदरच गोलंदाजांची एकंदरच भरीव कामगिरी पाहावयास मिळाली. एका पाठोपाठ एक विकेट गेल्यामुळे पाकिस्तानला २०० च्या आतच आपला गाशा गुंडाळावा लागला. तर पाकिस्तानला १९१ धावांवरच समाधान मानावे लागले. (World Cup 2023)
भारताने टॉस जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आणि भारताच्या गोलंदाजांनी यावेळी अचूक मारा करत त्यांना चांगलेच रोखले. पाकिस्तानने यावेळी ४१ धावांची दमदार सलामी दिली होती. त्यानंतर भारताच्या मदतीला धावून आला तो मोहम्मद सिराज. कारण सिराजने यावेळी अब्दुल्ला शफिकला २० धावावंर बाद केले आणि भारताला पहिले यश मिळवून दिले.
त्यानंतर हार्दिक पंड्याने इमाम उल हकला ३६ धावांवर बाद करत भारताला दुसरे यश मिळवून दिले. भारतीय संघ यावेळी चांगल्या फॉर्मात दिसत होता. पण त्यावेळी मैदानात होते ते कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानसारखे दोन दिग्गज खेळाडू. या दोघांनी यावेळी पाकिस्तानचा डाव सावरला. बाबरने यावेळी आपले अर्धशतक साजरे केले. या वर्ल्ड कपमधील त्याची ही सर्वोत्तम खेळी होती. त्यामुळे बाबर यावेळी मोठी खेळी साकारेल असेल वाटत होते. पण त्यावेळी मोहम्मद सिराज पुन्हा एकदा भारताच्या मदतीला धावून आला.
(हेही वाचा : Israel -Palestine Conflict : इस्रायली नागरिकांनी ठेवला जगासमोर आदर्श; ‘हा’ व्हिडिओ होत आहे व्हायरल)
कारण यावेळी सिराजने बाबरला क्लीन बोल्ड केले आणि तिथेच हा सामना भारताच्या दिशेने झुकला. कारण बाबर बाद झाला आणि त्यानंतर पाकिस्तानचा डाव गडगडला. त्यामुळे जेव्हा बाबर क्लीन बोल्ड झाला तो एकच चेंडू या सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरल्याचे पाहायला मिळाले. बाबर बाद झाल्यावर रिझवानला जसप्रीत बुमराने ४९ धावांवर असताना बाद केले आणि त्यानंतर पाकिस्तानचा संघ जास्त काळ तग धरू शकला नाही.
Join Our WhatsApp Community