- ऋजुता लुकतुके
महिलांमधील सध्याची अव्वल टेनिसपटू इगा स्वियातेकला (Iga Swiatek) दुबई ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ॲना कॅलिनस्कायाकडून ४-६, ४-६ असा धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलं. इगा खरंतर या स्पर्धेत दोहा आणि दुबई अशा सलग दोन स्पर्धा जिंकण्याच्या इराद्याने उतरली होती. पहिली ग्रँडस्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन संपल्यानंतर मध्य आशियातील या दोन स्पर्धा मानाच्या समजल्या जातात. आणि इथं इगाने सलग सात सामनेही जिंकले होते. त्यामुळे उपांत्य फेरीतही तीच वरचढ ठरेल असा अंदाज होता. (Iga Swiatek Defeated)
२२ वर्षीय इगा सलग दोन सेटमध्येच पराभूत झाला. ‘माझ्यात सामना पूर्ण करण्याचीही ताकद राहिली नव्हती. असं नेहमी होत नाही. पण, माझ्यात खेळासाठी काहीतरी देण्याचे त्राणच राहिले नव्हते,’ असं इगा सामन्यानंतर म्हणाली. इगाची (Iga Swiatek) प्रतिस्पर्धी ॲना कॅलिन्स्काया क्रमवारीत ४० व्या क्रमांकावर आहे. आणि १००० रेटिंग गुण असलेल्या स्पर्धेत ती पहिल्यांदा उपांत्य फेरीत पोहोचली होती. आणि इथं पात्रता फेरीचा अडथळा पार करत तिने मुख्य स्पर्धेत प्रवेश मिळवला होता. एरवी या वर्षी तिचा फॉर्म चांगला आहे. आणि ऑस्ट्रेलियन स्पर्धेतही तिने उपउपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. (Iga Swiatek Defeated)
(हेही वाचा – Vanchit Bahujan Aghadi अजून तळ्यात-मळ्यात)
‘इगा (Iga Swiatek) जागतिक क्रमवारीत अव्वल आहे. त्यामुळे माझी रणनीती साधी होती. शांत रहायचं. आणि तिला आक्रमक न होऊ देता मीच आक्रमक सुरुवात करायची. मी तिला संधी दिली असती तर तिने मला नेस्तनाबूत केलं असतं. म्हणून मीच आक्रमक सुरुवात केली,’ असं २५ वर्षीय ॲनाने या सामन्यानंतर सांगितलं. खरंतर या सामन्यात पहिल्या सेटमध्ये दोघांनी ४-४ अशी बरोबरी साधली होती. पण, त्यानंतर इगाने सलग ६ गेम गमावले. आणि पहिला सेट गमावल्यानंतर दुसऱ्या सेटमध्येही तिची अवस्था ०-२ अशी झाली. तेव्हाच इगा इतकी त्रासली होती की, तिने रागाने रॅकेट फेकून दिली. इगाच्या (Iga Swiatek) पराभवानंतर आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धांचा व्यस्त कार्यक्रम पुन्हा चर्चेत आला आहे. (Iga Swiatek Defeated)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community