Igor Stimac Removed : फुटबॉल प्रशिक्षक इगॉर स्टायमॅक यांची अखेर गच्छंती

Igor Stimac Removed : स्टायमॅक यांच्या नेतृत्वाखाली फुटबॉल संघ फिफा विश्वचषक पात्रता स्पर्धेत चमकदार कामगिरी करू शकला नाही.

124
Igor Stimac Removed : फुटबॉल प्रशिक्षक इगॉर स्टायमॅक यांची अखेर गच्छंती
  • ऋजुता लुकतुके

भारतीय फुटबॉल असोसिएशनने (Indian Football Association) फुटबॉल संघाचे राष्ट्रीय प्रशिक्षक इगॉर स्टायमॅक यांना १७ जूनलाच गच्छंतीची नोटीस पाठवल्याचं स्पष्ट केलं आहे. ‘स्याटमॅक यांना पदावरून काढून टाकल्याची नोटीस आम्ही पाठवली आहे. नोटीस मिळाल्यापासून लगेचच ते आपल्या जबाबदारीतून मुक्त असतील,’ असं फुटबॉल फेडरेशनच्या सचिवांच्या कार्यालयातून सांगण्यात आलं. फिफा विश्वचषक पात्रता स्पर्धेत भारतीय फुटबॉल संघ तिसऱ्या फेरीतही पोहोचू शकला नाही. कतार विरुद्ध १-२ पराभवानंतर आशियाई स्तरावरच भारताचं आव्हान संपुष्टात आलं. (Igor Stimac Removed)

त्यामुळे स्टायमॅक यांची गच्छंती अटळच होती. ‘आशियाई स्तरावरील पात्रता फेरीतील भारतीय संघाची कामगिरी पाहता, नवीन प्रशिक्षकाच्या हातात संघाची धुरा सोपवणंच आम्हाला योग्य वाटतं. फेडरेशनमधील सर्व सदस्यांनी एकमताने हा निर्णय घेतला आहे,’ असं भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या अधिकृत पत्रकात म्हटलं आहे. २०१९ मध्ये स्टायमॅक यांची भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. गेल्यावर्षी त्यांना एका वर्षासाठी मुदत वाढ मिळाली होती. (Igor Stimac Removed)

(हेही वाचा – Lok Sabha Constituency Result: ‘ती’ काय आईची शपथ घेणं आहे काय? रवींद्र वायकर यांचं संजय राऊत यांना प्रत्युत्तर)

५६ वर्षीय स्टायमॅक १९९८ च्या विश्वचषकात उपांत्य फेरी गाठलेल्या क्रोएशियाच्या फुटबॉल संघाचे सदस्य होते. २०१९ मध्ये त्यांनी भारतीय संघावर काम करायला सुरुवात केली. स्टिफन कॉन्स्टेंटाईन यांच्यानंतर स्टायमॅक यांनी ब्लू टायगर्स संघाचे प्रशिक्षक म्हणून सुरुवात केली. त्यांच्या कार्यकाळात भारतीय संघाने ४ महत्त्वाची विजेतेपदं पटकावली. यात दोन सॅफ स्पर्धा, तर एकदा इंटरकॉन्टिनेन्टल चषक आणि एकदा तीन देशांची मालिका जिंकण्याची कामगिरी केली आहे. (Igor Stimac Removed)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.