Imane Khelif : मुष्टियोद्धा इमाने खलीफ पुरुषच असल्याचा वैद्यकीय अहवाल समोर, तिला ऑलिम्पिकमध्ये का खेळू दिलं?

Imane Khelif : अल्जेरियाची मुष्टियोद्धा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदा चर्चेत आली होती. 

106
Imane Khelif : मुष्टियोद्धा इमाने खलीफ पुरुषच असल्याचा वैद्यकीय अहवाल समोर, तिला ऑलिम्पिकमध्ये का खेळू दिलं?
  • ऋजुता लुकतुके

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या मुष्टीयुद्धा सुवर्ण पदक जिंकलेली अल्जेरियाची इमाने खलीफ (Imane Khelif) ही पुरुष नसून महिला असल्याचं एका वैद्यकीय अहवालातून समोर आलं आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्येही तिचं विजेतेपद वादात सापडलं होतं. इटालीच्या करिनी या मुष्टियोद्धीने ४१ सेकंदांत इमाने विरुद्धचा सामना सोडला आणि त्यानंतर तिच्याशी खेळणं अशक्य असल्याचं मत व्यक्त केलं होतं. तेव्हाच ती पहिल्यांदा चर्चेत आली होती. पण, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनेच तिला खेळण्याची परवानगी दिल्यामुळे तेव्हा तो वाद मिटला होता.

पण, आता तिचा एक जुना वैद्यकीय अहवाल बाहेर आला आहे आणि त्यानुसार तिच्या शरीरात अंडकोष असल्याचं आणि तिची गुणसूत्र एक्सवाय असल्याचं दिसत आहे. याचाच अर्थ ती महिला विभागात खेळण्यासाठी अपात्र आहे असा होतो. यापूर्वी २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध परिषदेनं एका वैद्यकीय अहवालानुसार इमाने (Imane Khelif) मुलगी नाही तर मुलगा असल्याचा निर्वाळा देत तिच्या खेळण्यावर बंदी घातली होती. पण, ऑलिम्पिक समितीने त्यानंतर जागतिक मुष्टियुद्ध संघटनेवरच बंदी घातली आणि त्यांनी केलेली लिंगओळख चाचणी सदोष असल्याचा निर्वाळा दिला. त्यामुळेच इमानेला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळता आलं.

(हेही वाचा – US Election Results: २७७ बहुमताचा आकडा गाठत Donald Trump ठरले अमेरिकेचे ४७ वे अध्यक्ष)

नेमकं प्रकरण काय आहे ते पाहूया

२०२३ मध्ये नवी दिल्लीतील एका स्पर्धेदरम्यान वेल्टरवेट प्रकारातील मुष्टियुद्ध स्पर्धेत इमाने खलीफ (Imane Khelif) आणि तैवानची ली यु तिंग या दोघींना लिंगओळख चाचणी पार करता आली नाही. जागतिक मुष्टियुद्ध संघटनेनं घेतलेली ही चाचणी दोन प्रकारची होती. पण, आंतरराष्ट्रीय मान्यता असलेली टेस्टेस्टरोन चाचणी तेव्हा झाली नाही. पण, घेतलेल्या चाचण्यांच्या आधारे जागतिक संघटनेनं इमाने आणि ली या दोघी महिला विभागात खेळण्यासाठी अपात्र असल्याचा निर्वाळा दिला. दोघांवर निलंबनाची कारवाईही केली. तेव्हाच्या चाचणीची निरीक्षणं बाहेर आली नव्हती.

२०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने जागतिक मुष्टीयुद्ध संघटनेवर भ्रष्टाचार आणि इतर काही गोष्टींसाठी कारवाई करत ही संघटनाच निलंबित केली. त्यांनी घेतलेले आधीचे निर्णय त्यामुळे रद्दबादल ठरले. या दोन मुष्टियुद्धांच्या बाबतीत आधी झालेल्या चाचण्या सदोष असल्याचा निर्वाळा ऑलिम्पिक समितीने दिला. इमाने (Imane Khelif) आणि ली या दोघी सिसजेंडर महिला आहेत आणि जन्माच्या वेळी त्यांना महिला म्हणून ओळख मिळाली आहे. त्यांच्या पासपोर्टवर महिला असल्याचाच शिक्का आहे आणि या गोष्टी ऑलिम्पिक समितीने नियमानुसार ग्राह्य धरल्या. त्यामुळेच इमाने खलीफला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला म़्हणून लढता आलं.

आताही ऑलिम्पिक समितीची भूमिका आहे आधीचीच आहे. पण, फ्रेंच पत्रकार जफर ऑडियाने इमाने खलीफचा (Imane Khelif) जुना वैद्यकीय अहवाल आपल्या हाती लागल्याचं म्हटलं आहे. या अहवालानुसार इमानेच्या शरीरात गर्भाशय नाही. तसंच तिला ‘मायक्रोपेनीज्’ असल्याचं या एमआरआय चाचणीत दिसत आहे. शिवाय तिच्या गुणसूत्रांची जडण घडणही एक्सवाय पद्धतीची आहे. आता या नवीन अहवालावर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती काही कारवाई करते का, हे पाहावं लागेल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.