Imane Khelif : वैद्यकीय अहवाल फुटल्याप्रकरणी इमाने खलीफ करणार कायदेशीर कारवाई

Imane Khelif : अलीकडेच एका फुटलेल्या वैद्यकीय अहवालातून इमाने खलीफ पुरुष असल्याचं समोर आलं होतं. 

78
Imane Khelif : वैद्यकीय अहवाल फुटल्याप्रकरणी इमाने खलीफ करणार कायदेशीर कारवाई
  • ऋजुता लुकतुके

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये वेल्टरवेट गटात अल्जेरियाच्या इमाने खलीफने (Imane Khelif) महिला गटात सुवर्ण जिंकलं होतं. त्यानंतर गेल्या आठवड्यात इमाने ही प्रत्यक्षात पुरुष असल्याचा एक वैद्यकीय अहवाल फ्रेंच वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाला होता. हा वैद्यकीय अहवाल फुटलेला म्हणजे अधिकृतपणे बाहेर आलेला नव्हता. त्यामुळे इमाने खलीफविषयी पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली होती. यावर आता इमाने खलीफ कायदेशीर दाद मागणार असल्याचं समजतंय. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने ही गोष्ट स्पष्ट केली आहे.

‘इमाने खलीफच्या (Imane Khelif) लिंग ओळखीवरून तिच्याबद्दल ज्यांनी ज्यांनी जाहीर टीका किंवा विधानं केली, त्यांच्या विरोधात इमाने कायदेशीर सल्ला घेणार आहे. तसंच अलीकडे काही वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या बातम्यांच्या बाबतीतही ती न्यायालयात दाद मागणार आहे. हे प्रकरण आता न्याय प्रवीष्ट आहे. त्यामुळे जोपर्यंत यात काही ठोस हाती लागत नाही, तोपर्यंत ऑलिम्पिक समिती कुठलीही कारवाई करणार नाही किंवा यावर कुठलीही प्रतिक्रियाही देणार नाही. न्यायालयाच्या निकालाची आम्हाला प्रतीक्षा आहे,’ असं ऑलिम्पिक समितीने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.

(हेही वाचा – Virat Kohli : ‘विराट कोहली किमान २०२७ पर्यंत नक्की खेळेल’)

दरम्यान हे प्रकरण नेमकं काय आहे ते पाहूया,

२०२३ मध्ये नवी दिल्लीतील एका स्पर्धेदरम्यान वेल्टरवेट प्रकारातील मुष्टियुद्ध स्पर्धेत इमाने खलीफ (Imane Khelif) आणि तैवानची ली यु तिंग या दोघींना लिंगओळख चाचणी पार करता आली नाही. जागतिक मुष्टियुद्ध संघटनेनं घेतलेली ही चाचणी दोन प्रकारची होती. पण, आंतरराष्ट्रीय मान्यता असलेली टेस्टेस्टरोन चाचणी तेव्हा झाली नाही. पण, घेतलेल्या चाचण्यांच्या आधारे जागतिक संघटनेनं इमाने आणि ली या दोघी महिला विभागात खेळण्यासाठी अपात्र असल्याचा निर्वाळा दिला आणि दोघांवर निलंबनाची कारवाईही केली. तेव्हाच्या चाचणीची निरीक्षणं बाहेर आली नव्हती.

२०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने जागतिक मुष्टीयुद्ध संघटनेवर भ्रष्टाचार आणि इतर काही गोष्टींसाठी कारवाई करत ही संघटनाच निलंबित केली. त्यांनी घेतलेले आधीचे निर्णय त्यामुळे रद्दबादल ठरले. या दोन मुष्टियुद्धांच्या बाबतीत आधी झालेल्या चाचण्या सदोष असल्याचा निर्वाळा ऑलिम्पिक समितीने दिला. इमाने (Imane Khelif) आणि ली या दोघी सिसजेंडर महिला आहेत आणि जन्माच्या वेळी त्यांना महिला म्हणून ओळख मिळाली आहे. त्यांच्या पासपोर्टवर महिला असल्याचाच शिक्का आहे आणि या गोष्टी ऑलिम्पिक समितीने नियमानुसार ग्राह्य धरल्या. त्यामुळेच इमाने खलीफला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला म्हणून लढता आलं.

आताही ऑलिम्पिक समितीची भूमिका आहे आधीचीच आहे. पण, फ्रेंच पत्रकार जफर ऑडियाने इमाने खलीफचा जुना वैद्यकीय अहवाल आपल्या हाती लागल्याचं म्हटलं आहे आणि या अहवालानुसार इमानेच्या (Imane Khelif) शरीरात गर्भाशय नाही. तसंच तिला ‘मायक्रोपेनीज्’ असल्याचं या एमआरआय चाचणीत दिसत आहे. शिवाय तिच्या गुणसूत्रांची जडण घडणही एक्सवाय पद्धतीची आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.