- ऋजुता लुकतुके
विश्वचषकादरम्यान प्रत्येक सामन्यानंतर दिला जाणारा सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार आता मालिकेनंतर दिला जातो. (Impact Fielder in the Team)
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेत मोहम्मद सिराज संघाचा प्रभावशाली क्षेत्ररक्षक ठरला आहे. यापूर्वी प्रत्येक सामन्यानंतर सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार भारतीय ड्रेसिंग रुममध्ये दिला जात होता. आता तो मालिकेनंतर दिला जाणार आहे. क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक टी दिलिप यांनी सिराजला विजेता घोषित करताना यशस्वी जयसवाल आणि रिंकू सिंग यांचंही कौतुक केलं. (Impact Fielder in the Team)
भारतीय संघाने आफ्रिकेबरोबरची टी-२० मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली आणि दुसऱ्या सामन्यात तर १०६ धावांनी विजय मिळवला. गोलंदाजी आणि फलंदाजीवर खेळाडू मेहनत घेतात तशीच मेहनत धावा वाचवण्यात घ्यावी, चांगले झेल पकडावेत यासाठी टी दिलिप यांनी विश्वचषका दरम्यान हा पुरस्कार सुरू केला आणि खेळाडूंकडूनही त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. (Impact Fielder in the Team)
(हेही वाचा – Lokayukta Bill : लोकायुक्त विधेयक विधानपरिषदेत एकमताने मंजूर)
आता दक्षिण आफ्रिका मालिकेत महम्मद सिराज सर्वोत्तम ठरला आहे आणि त्यानेही या पुरस्कारासाठी आनंद व्यक्त केला आहे. भारतीय खेळाडूंकडून या ड्रेसिंग रुममधील पुरस्कार सोहळ्याचं स्वागतच झालं आहे आणि त्यामुळे खेळाडूंची क्षेत्ररक्षणातील कामगिरीही सुधारली आहे. त्यामुळे मीडियाकडूनही या पुरस्काराची चर्चा होते. (Impact Fielder in the Team)
The much loved Fielding Medal 🥇 ceremony is 🔙 in a new avatar 👌
Introducing – The ‘Impact Fielder of the T20I Series’ 🙌 💪#TeamIndia | #SAvIND
— BCCI (@BCCI) December 15, 2023
‘सिराज हा नेहमीच सजग क्रिकेटपटू राहिला आहे आणि आपल्या कौशल्याने तो खेळावर नियमितपणे छाप पाडतो. इथं त्याने फक्त गोलंदाज म्हणून नाही तर आपल्या क्षेत्ररक्षणाने छाप पाडली. एरवी तेज गोलंदाज आपल्या शरीरयष्टीमुळे क्षेत्ररक्षणात कमी पडतात असा समज होता. पण, आता सिराजने हा पुरस्कार मिळवून हे म्हणणं खोटं ठरवलं आहे,’ असं टी दिलिप सिराजविषयी बोलताना म्हणाले. (Impact Fielder in the Team)
त्याचबरोबर युवा खेळाडू रिंकू सिंग आणि यशस्वी जयसवाल यांनीही अचूक झेल टिपण्यात कसूर केली नाही, असं दिलिप यांनी बोलून दाखवलं. (Impact Fielder in the Team)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community