-
ऋजुता लुकतुके
क्रिकेटमधून लिंगभेद कमी व्हावा आणि महिलांनाही क्रिकेट खेळण्याची समान संधी मिळावी या हेतूने अफगाणिस्तान (Afghanistan) क्रिकेटच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (International Cricket Council) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानमध्ये सध्या तालिबानी राजवट आहे. त्या अंतर्गत महिलांना क्रिकेट खेळायला परवानगी नाही. त्यामुळे देशातून स्थलांतरित झालेल्या महिलांसाठी आयसीसीने एक मोहीम उघडली आहे. बीसीसीआय, इंग्लिश क्रिकेट बोर्ड आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांच्या सहकार्याने आयसीसीने स्थलांतरित महिलांच्या पुनर्वसनासाठी सर्वंकष प्रयत्न सुरू केले आहेत. (ICC Initiative)
त्यासाठी आयसीसीने एक विशेष कृतीदल स्थापन केलं असून त्याअंतर्गत एक निधी तयार करण्यात येणार आहे. या निधीतून महिलांना त्यांची कारकीर्द घडवण्यासाठी सर्व प्रकारच मदत दिली जाईल. तर एका योजनेअंतर्गत या मुलींना अत्याधुनिक क्रिकेट प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि सर्व प्रकारच्या संधी मिळाव्यात यासाठी खास प्रयत्न केले जाणार आहेत. (ICC Initiative)
(हेही वाचा – IPL 2025, RCB vs RR : मैदानावरील पंचांनी खेळ थांबवून हेटमायर आणि सॉल्टची बॅट का तपासली?)
‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत सर्वसमावेशकतेला महत्त्व आहे. तो आमचा पायाच आहे. त्यामुळे सभोवतालचं वातावरण, परिस्थिती कशीही असो, खेळाडूला क्रिकेट खेळण्याची, त्यात पुढे जाण्याची संधी मिळाली पाहिजे, यासाठी आयसीसी कटीबद्ध आहे,’ असं आयसीसीचे अध्यक्ष जय शाह (Jai Shah) यांनी बोलून दाखवलं आहे. (ICC Initiative)
I’m proud to announce on behalf of the @ICC a landmark initiative we’ve partnered on with the BCCI, England & Wales Cricket Board and Cricket Australia to assist displaced Afghan women cricketers in both their cricketing and development journeys.
Media release:… pic.twitter.com/Rf3n0ZBy53
— Jay Shah (@JayShah) April 13, 2025
‘क्रिकेटचा जागतिक विकास तसंच खेळातून एकोपा, लढाऊ वृत्ती व आशा जागवण्याचा आयसीसीचा हा प्रयत्न आहे,’ असं आयसीसीने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. या उपक्रमाला नेमकी कधी सुरुवात होणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही. आयसीसीने आपल्या सर्वसाधारण सभेत आयसीसी क्रिकेट विषयक समितीसाठी सदस्यांची नियुक्तीही जाहीर केली आहे. महिला व पुरुषांच्या दोन वेगळ्या समित्या आहेत. (ICC Initiative)
- आयसीसी क्रिकेट विषयक परिषद (महिला) – कॅथरिन कँपबेल, एवरिल फाए व फोलेत्सी मोसेकी
- आयसीसी क्रिकेट विषयक परिषद (पुरुष) – सौरव गांगुली, हमीद हसन, टेंबा बवुमा, डेसमंड हेन्स, व्ही व्ही एस लक्ष्मण व जोनाथन ट्रॉट
हेही पहा –
Join Our WhatsApp Community