सावरकर स्मारकाच्या फेन्सिंग क्लबमधील वैभवीचा राष्ट्रीय स्तरावर पराक्रम!

83

फेन्सिंग (तलबाजी) क्रीडा प्रकारातील आंतरराष्ट्रीय खेळाडू कुमारी वैभवी इंगळे ही वर्षभरापासून दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकातील सावरकर फेन्सिंग क्लब येथे तलवारबाजीचे प्रशिक्षण घेत आहे. या ठिकाणी ती कोच आनंद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. अनेक वर्षांच्या प्रशिक्षणानंतर महाराष्ट्राचे नेतृत्व करत वैभवी व संघाने सांघिक कामगिरी करत, महाराष्ट्राकरीता फेन्सिंगमध्ये रौप्य पदक जिंकले आहे.

हरियाणामध्ये यशस्वी कामगिरी

वैभवी गेल्या ६ वर्षांपासून फेन्सिंगचे प्रशिक्षण घेत आहे. या दरम्यान तिला आनंद वाघमारे यांनी मार्गदर्शन केले. राज्यस्तरीय स्पर्धेत वैभवीने यापूर्वी रौप्यपदक जिंकले होते. यातून चार मुलींची राष्ट्रीय फेन्सिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यासाठी निवड करण्यात आली.  या चार मुलींनी सांघिक कामगिरी करत हरियाणातील सोनीपत येथे २९ व्या कनिष्ठ राष्ट्रीय फेन्सिंग (फॉइल गर्ल्स टीम इव्हेंट) स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे.

( हेही वाचा : महाराष्ट्रातील कोरोना निर्बंध अजून कडक होणार? राजेश टोपेंचा इशारा )

यशाचा आनंद

वैभवी महाराष्ट्राच्या संघासमवेत येत्या दोन दिवसात मुंबईत दाखल होणार आहे. विद्यापीठात झालेल्या ऑल इंडिया युनिव्हर्सिटी फेन्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत सुद्धा वैभवीची निवड करण्यात आली होती, अशी माहिती तिचे मार्गदर्शक आनंद वाघमारे यांनी दिली आहे. यातही तिने सुवर्ण पदक जिंकलेले आहे. जिंकल्यावर मी खूप आनंदी आहे. परंतु आता सलग स्पर्धा असल्यामुळे मला जोमाने तयारी करावी लागणार आहे, अशी प्रतिक्रिया वैभवी हिने दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.