P V Sindhu : तू कुणाला डेट केलं आहेस का, या प्रश्नावर सिंधूने दिलं ‘हे’ उत्तर

पी व्ही सिंधू सध्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे ४ महिने बॅडमिंटनपासून दूर आहे. तेव्हा एका पॉडकास्टमध्ये तिने काही खाजगी प्रश्नांना उत्तरं दिली. 

484
P V Sindhu : तू कुणाला डेट केलं आहेस का, या प्रश्नावर सिंधूने दिलं ‘हे’ उत्तर
P V Sindhu : तू कुणाला डेट केलं आहेस का, या प्रश्नावर सिंधूने दिलं ‘हे’ उत्तर
  • ऋजुता लुकतुके

पी व्ही सिंधू (P V Sindhu) सध्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे ४ महिने बॅडमिंटनपासून दूर आहे. तेव्हा एका पॉडकास्टमध्ये तिने काही खाजगी प्रश्नांना उत्तरं दिली. (P V Sindhu)

ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं आणि माजी विश्वविजेती पी व्ही सिंधू P V Sindhu) सध्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे बॅडमिंटन कोर्टच्या बाहेर आहे. अलीकडेच तिने प्रकाश पदुकोण यांना आपला मेंटॉरपदाची जबाबदारी दिल्यामुळे तिने सध्या हैद्राबाद सोडून बंगळुरूमध्ये मुक्काम हलवला आहे. बॅडमिंटन कोर्टच्या बाहेरचा वेळ ती सोशल मीडियावर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करत घालवताना दिसतेय. (P V Sindhu)

(हेही वाचा – Cricket Stars in GTA 6 Roles : जीटी ६ व्हीडिओ गेमच्या ट्रेलरमध्ये विराट, हार्दिक आणि रोहित)

अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये सिंधूने (P V Sindhu) काही खाजगी प्रश्नांनाही बिनदिक्कत उत्तरं दिली. तिचं उत्तर मात्र ठाम होतं. ते म्हणजे, ‘पॅरिस ऑलिम्पिक हेच तिच्या आयुष्याचं पहिलं ध्येय आहे.’ (P V Sindhu)

बाकी खाजगी प्रश्नांनाही तिने हातचं न राखून ठेवता उत्तरं दिली. ‘तुझं रिलेशनशिप स्टेटस काय,’ या प्रश्नाला तिने ‘सिंगल,’ असं उत्तरर दिलं. तर ‘तुला कधी पार्टनरची गरज भासते का,’ या प्रश्नाचं उत्तर देताना सिंधूने (P V Sindhu) म्हटलं, ‘हो. तसं तर ते कधी ना कधी होणारच आहे. ते नशिबावर अवलंबून आहे. जेव्हा ती वेळ येईल, तेव्हा येईल.’ (P V Sindhu)

पुढचा प्रश्न जास्त थेट होता. ‘तू कधी कुणाला डेट केलं आहेस का?’

आणि यावर सिंधूचं उत्तर होतं, ‘नाही. तसं कुणाला नाही.’

सिंधूने पॅरिस ऑलिम्पिक हेच आपलं पुढील उद्दिष्ट असल्याचं या पॉडकास्टमध्येही आवर्जून सांगितलं आणि त्यासाठीच तिने बंगळुरूमध्ये मुक्काम हलवला आहे. यापूर्वी आशियाई क्रीडास्पर्धेपूर्वी एक आठवडा तिने प्रकाश पदुकोण यांच्याबरोबर सरावाला सुरुवात केली होती. आणि त्या स्पर्धेनंतर आपला निर्णय तिने अधिकृतपणे ट्विटरवर जाहीरही केला होता. (P V Sindhu)

‘जे सतत मला हा प्रश्न विचारताय आणि ज्यांना याबद्दल उत्सुकता आहे अशांसाठी मी एक गोष्ट उघड करत आहे. इथून पुढे मी प्रकाश पदुकोण सरांबरोबर सराव करणार आहे. ते माझे मेंटॉर असतील,’ असं सिंधू (P V Sindhu) ट्विटरवरील एका पोस्टमध्ये म्हणाली होती. (P V Sindhu)

(हेही वाचा – Marathi Sign Board : मराठी पाट्यांवरून मनसेचा ठाण्यातील दुकानदारांना तीन दिवसांचा अल्टिमेटम)

यावर्षी फेब्रुवारी महिन्यात सिंधूने (P V Sindhu) कोरियन प्रशिक्षक पार्क ते सँगबरोबरचा करार रद्द केला. पार्कबरोबर तिने टोकयो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकलं होतं. त्यानंतर काही काळ ती साईच्या बॅडमिंटन प्रशिक्षक विधी चौधरी यांच्याबरोबर सराव करत होती आणि त्यानंतर सिंधूने मोहम्मद हाफिज हाशिम यांची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. आता हशिम तिच्याबरोबर स्पर्धेदरम्यान असतील आणि एरवी ती प्रकाश पदुकोण यांच्याबरोबर काम करेल. (P V Sindhu)

सध्या सिंधू (P V Sindhu) गुडघ्याच्या दुखापतीमुळे बाहेर आहे आणि तिने जागतिक बॅडमिंटन फेडरेशनला आपलं क्रमवारीतील दहावं स्थान गोठवण्यास सांगितलं आहे. खेळाडू ४ महिन्यांच्या वर दुखापत किंवा तितक्याच गंभीर कारणामुळे खेळू शकणार नसेल तर क्रमवारीतील स्थान गोठवण्याची किंवा फ्रीज करण्याची सोय आहे. त्यामुळे टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरताना सिंधूला मदत होईल. (P V Sindhu)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.