- ऋजुता लुकतुके
भारत ए विरुद्ध ऑस्ट्रेलिया ए अशी एक अनधिकृत कसोटी मालिका दोन्ही संघांदरम्यान सध्या सुरू आहे आणि यातील दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियन संघाने ६ गडी राखून विजय मिळवला आहे. तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघासमोर विजयासाठी १६९ धावांचं आव्हान होतं आणि प्रसिध कृष्णा, मुकेश कुमारच्या गोलंदाजीसमोर त्यांची अवस्था ४ बाद ७३ अशी बिकट झाली होती. पण, मधल्या फळीतील सॅम कोनस्टास (७३) आणि बॉय वेबस्टर (४६) यांनी नाबाद ९६ धावांची भागिदारी रचत ऑस्ट्रेलिया ए संघाला विजय मिळवून दिला. (Ind A vs Aus A)
या दोघांनी कमी वेळात ही भागिदारी रचून तिसऱ्या दिवशीच खेळ विजय संपादन केला. मालिकेतही ऑस्ट्रेलिया संघाने आता २-० ने आघाडी मिळवली. या मालिकेत आतापर्यंत भारतीय फलंदाजी अपयशी ठरली आहे. आताही पहिल्या डावांत भारतीय ए संघ ६२ धावांनी पिछाडीवर पडला होता. दुसऱ्या डावातही भारताची आघाडीची फळी झटपट बाद झाली होती. आणि भारताचे पहिले ५ गडी ५६ धावांवर बाद झाले होते. (Ind A vs Aus A)
(हेही वाचा – मविआ म्हणजे भ्रष्टाचार, टोकन मनी… ; पंतप्रधान Narendra Modi यांची अकोल्यात मविआवर टीका)
पण, ध्रुव जुरेलने पुन्हा एकदा डाव सावरला. ६८ धावा करत भारतीय डावाला त्याने आकार दिला. जुरेलच्या बरोबरीने नितिश रेड्डी (३८), तनुष कोटियन (४४) आणि प्रसिध कृष्णन (२९) यांनी छोट्या छोट्या भागिदारी रचून भारताची धावसंख्या २०० च्या पार नेली आणि ऑस्ट्रेलियासमोर जिंकण्यासाठी १६९ धावांच आव्हान आलं. तिसऱ्या दिवशी उर्वरित ६९ षटकांत ऑस्ट्रेलियाला ही धावसंख्या पार करायची होती. पण, ४ बाद ७३ नंतर कोनस्टास आणि वेबस्टर यांनी ऑस्ट्रेलियासाठी हा विजय साध्य केला. (Ind A vs Aus A)
भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघांची अधिकृत मालिका २२ नोव्हेंबरपासून पर्थ इथं सुरू होत आहे आणि त्या दृष्टीने भारतीय फलंदाजांची परीक्षा म्हणून या मालिकेकडे पाहिलं जात होतं. कारण, रोहित शर्मा पहिली कसोटी खेळणार नाहीए. आणि त्याच्याऐवजी संघात स्थान मिळवण्यासाठी के एल राहुल, ईश्वरन आणि सर्फराझ यांच्यात स्पर्धा असेल. (Ind A vs Aus A)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community