Akshar Patel on Team Selection : टी-२० विश्वचषकासाठी माझी स्पर्धा माझ्याशीच आहे

दुखापतीमुळे एकदिवसीय विश्वचषकातील संधी हुकली होती. आता टी-२० विश्वचषकासाठी अक्षरला पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करावं लागणार. 

206
Akshar Patel on Team Selection : टी-२० विश्वचषकासाठी माझी स्पर्धा माझ्याशीच आहे
Akshar Patel on Team Selection : टी-२० विश्वचषकासाठी माझी स्पर्धा माझ्याशीच आहे
  • ऋजुता लुकतुके

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी अक्षर पटेलची भारतीय संघात निवड झाली होती. पण, दुखापतीमुळे ऐनवेळी त्याला स्पर्धेत सहभागी होता आलं नाही. तेव्हा जी बस चुकली ती आता पकडताना अक्षरसमोर वेगळी आव्हानं आहेत. अजूनही तो रांगेतच आहे. कारण, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, रवी अश्विन, यजुवेंद्र चहल अशी स्पर्धा त्याच्यासमोर आहे. (Akshar Patel on Team Selection)

पण, संधी मिळेल तेव्हा आणि तिथे फलंदाजांना बाद करत भारतीय संघाचा दरवाजा ठोठावण्याचं काम अक्षर करतच राहणार आहे. आणि सामन्यांमध्ये बळी मिळवत राहायचे, हीच त्याची रणनीती असणार आहे. अफगाणिस्तान विरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात अक्षरने लागोपाठच्या २ षटकांत २ बळी टिपले. आणि या मालिकेबरोबरच आगामी आयपीएलमध्ये तो हेच करणार आहे. फलंदाजांना बाद करण्याचा प्रयत्न करणार आहे. (Akshar Patel on Team Selection)

‘गोलंदाजी करणं आणि फलंदाज बाद करणं ही एक प्रक्रिया आहे. खेळासाठी १०० टक्के दिल्याने ते होतं. मी इथून पुढे तेच करणार आहे. मला टी-२० विश्वचषकासाठी संघ निवडीचा विचारही नाही करायचा. कारण, तसं करून मी उगीचच स्वत:वर दडपण आणू इच्छित नाही,’ असं अक्षर सामन्यानंतर मीडियाशी बोलताना म्हणाला. (Akshar Patel on Team Selection)

(हेही वाचा – LK Advani : प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने लालकृष्ण अडवाणी यांनी केले पंतप्रधान मोदींचे कौतुक)

विश्वचषका दरम्यान दुखापतीमुळे जो ब्रेक मिळाला, तेव्हा अक्षर बंगळुरूच्या क्रिकेट अकादमीत सराव करत होता. तिथे त्याने गोलंदाजीतील वेगात करायचे बदल आणि अचूकता यावर काम केलं आहे. आणि त्याचा त्याला फायदा होताना दिलतोय. ‘पूर्वी मी धावा रोखण्यासाठी गोलंदाजी करायचो. आता ज्येष्ठांच्या सल्ल्याने मी बळी मिळवण्यासाठी गोलंदाजी करतो,’ असं अक्षर या काळाबद्दल बोलताना म्हणाला. (Akshar Patel on Team Selection)

टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात गोलंदाजांमध्ये तीव्र चुरस आहे याची त्याला कल्पना आहे. पण, आपली स्पर्धा फक्त आपल्याशी आहे, याच विचाराने तो प्रयत्न करणार आहे. (Akshar Patel on Team Selection)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.