IND v ZIM : झिम्बाब्वेचा डाव 134 धावांवर आटोपला; भारताने दुसरा सामना जिंकल्याने मालिका 1-1 ने बरोबरीत

भारताकडून अभिषेक शर्माने 47 चेंडूत 7 चौकार आणि 8 षटकार लगावत 100 धावा केल्या, ही भारतीय खेळाडूची झिम्बाब्वेविरुद्धची (IND v ZIM) सर्वोच्च धावसंख्या आहे. तर ऋतुराज गायकवाडने 47 चेंडूत 77 धावा केल्या.

156

टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने झिम्बाब्वेला (IND v ZIM)  235 धावांचे लक्ष्य दिले. भारताने T-20 मध्ये 34व्यांदा 200 हून अधिक धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने 23 वेळा अशी कामगिरी केली आहे. हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये रविवारी भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. संघाने 20 षटकांत 2 बाद 234 धावा केल्या. झिम्बाब्वेविरुद्धची ही भारताची सर्वात मोठी धावसंख्या आहे. यापूर्वीचा विक्रम 186 धावांचा होता.

भारताकडून अभिषेक शर्माने 47 चेंडूत 7 चौकार आणि 8 षटकार लगावत 100 धावा केल्या, ही भारतीय खेळाडूची झिम्बाब्वेविरुद्धची (IND v ZIM) सर्वोच्च धावसंख्या आहे. तर ऋतुराज गायकवाडने 47 चेंडूत 77 धावा केल्या. दोघांमध्ये 132 धावांची विक्रमी भागीदारी झाली. झिम्बाब्वेविरुद्धची ही भारताची सर्वोच्च भागीदारी आहे. रिंकू सिंगने 22 चेंडूत 48 धावांचे योगदान दिले. झिम्बाब्वेकडून ब्लेसिंग मुझाराबानी आणि वेलिंग्टन मसाकादझा यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

(हेही वाचा Muslim : धर्मांध अदनानकडून हिंदू विद्यार्थिनीचा छळ; कुटूंबाला लोखंडी रॉडने मारहाण; कुटुंबिय घर सोडून गेले)

235 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या झिम्बाब्वेने (IND v ZIM) पहिल्याच षटकात एक विकेट गमावली. ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर मुकेश कुमारने कैया इनोसंटला बोल्ड केले. झिम्बाब्वेनेही 3 षटकांत दुसरी विकेट गमावली. या षटकात सलग दोन षटकार मारल्यानंतर मुकेश कुमारने ब्रायन बेनेटला बोल्ड केले. डावाच्या चौथ्या षटकात आलेल्या आवेश खानने दोन गडी बाद केले. त्याने षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर डीओन मायर्स आणि सिकंदर रझा यांच्या विकेट्स घेतल्या. त्यानंतर झिम्बाब्वेचा संघ गडगडला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.