- ऋजुता लुकतुके
भारतीय क्रिकेट संघाला जून महिन्यात होणाऱ्या टी-२० विश्वचषकापूर्वी एक शेवटची टी-२० मालिका अफगाणिस्तानविरुद्ध खेळायला मिळत आहे. आणि पहिलाच सामना होता तो मोहालीत कडाक्याच्या थंडीत. इथं दिवसभर तापमान होतं ८ अंश सेल्सिअस. आणि रात्री सामन्याच्या वेळी ते ५ ते ६ अंशांपर्यंत खाली उतरलं. (Ind vs Afg 1st T20)
अर्शदीप सिंग आणि शुभमन गिल या पंजाबी मुंड्यांसाठी हे तापमान नेहमीचं होतं. अर्शदीप तर सामन्याच्या वेळी अर्ध्या बाह्यांचा टी-शर्ट घालून आरामात वावरत होता. पण, बाकीच्या खेळाडूंची चांगलीच पंचाईत झाली. सामन्यापूर्वी बीसीसीआयने अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि शुभमन गिल यांचा एक व्हिडिओ ट्विटवर प्रसिद्ध केला होता. (Ind vs Afg 1st T20)
यात अक्षर आणि कुलदीप, ‘बघितलंस का, किती अंशांवर आलंय तापमान ते?’ असा प्रश्न शुभमनला विचारतात. (Ind vs Afg 1st T20)
Jacket 🧥 ON
Warmers ON
Gloves 🧤 ON #TeamIndia have a funny take on their “chilling” ❄️🥶 training session in Mohali. #INDvAFG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/rWeodTeDr2— BCCI (@BCCI) January 11, 2024
(हेही वाचा – Yashasvi Jaiswal Injury : यशस्वी जयसवालची जांघेची दुखापत किती गंभीर?)
कडाक्याच्या थंडीत सराव करताना खेळाडू कसं तापमानाशी जुळवून घेत होते ते या व्हिडिओत दिसतं. सामन्यापूर्वीचा सकाळचा हा व्हिडिओ आहे. खेळाडूंनी जॅकेट, हूडी आणि ग्लव्ह्ज घातले आहेत. आणि सतत हात चोळत आहेत. आणि आपापसात बोलताना चर्चेचा विषय एकच आहे, हवा आणि तापमान! (Ind vs Afg 1st T20)
अफगाणिस्तान विरुद्धचा पहिला टी२० सामना जिंकून भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आणि पुढचे सामने १४ तारखेला इंदूर तर १७ तारखेला बंगळुरू इथं आहेत. (Ind vs Afg 1st T20)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community