Ind vs Afg 1st T20 : शिवम दुबेचं भारतीय संघात दमदार पुनरागमन

भारतीय संघाने अफगाणिस्तान विरुद्धचा पहिला टी-२० सामना ६ गडी राखून जिंकला. आणि यात शिवम दुबेनं अष्टपैलू कामगिरी बजावली.

207
Ind vs Afg 1st T20 : शिवम दुबेचं भारतीय संघात दमदार पुनरागमन
Ind vs Afg 1st T20 : शिवम दुबेचं भारतीय संघात दमदार पुनरागमन
  • ऋजुता लुकतुके

मोहालीच्या कडाक्याच्या थंडीत भारतीय संघाने अफगाणिस्तानवर ६ गडी राखून विजय मिळवला. आणि मालिकेतही १-० अशी आघाडी घेतली. पहिल्याच सामन्यात यशस्वी जयसवाल दुखापतीमुळे खेळू शकला नाही. तर विराट कोहलीनेही (Virat Kohli) वैयक्तिक कारणामुळे सुटी घेतली होती. अशावेळी भारतीय फलंदाजीची मदार रोहित, शुभमन, रिंकू सिंग यांच्याबरोबरीने होती ती शिवम दुबे, (Shivam Dube) जितेन शर्मा आणि वॉशिंग्टन सुंदरवर.

रोहित शून्यावर तर शुभमन गिल चांगल्या सुरुवातीनंतर २३ धावांवर बाद झाला. आणि मग विजयासाठी १५९ धावांची गरज असताना युवा फलंदाजांवर जबाबदारी होती ती संघाला सीमेपार नेण्याची. जितेन शर्मा आणि शिवम दुबेनं (Shivam Dube) ही जबाबदारी नीट पार पाडली.

विराट, श्रेयस आणि राहुल हे ज्येष्ठ खेळाडू नसल्याने शिवमला चौथ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळाली. आणि या संधीचा त्याने फायदा उचलला. ४० चेंडूंत ६० धावा करताना त्याने २ षटकार आणि ५ चौकार लगावले. शिवाय मोक्याच्या क्षणी गोलंदाजीत एक बळीही घेतला.

(हेही वाचा – Bhagwan Das: भारताचा पहिला भारतरत्न पुरस्कारप्राप्त आध्यात्मिक गुरु आणि तत्त्वज्ञ “भगवान दास”)

‘राष्ट्रीय संघासाठी बऱ्याच कालावधीनंतर खेळत होतो. शिवाय, चौथा क्रमांकही आव्हानात्मक असतो. त्याने सुरुवातीला दडपण आलं होतं. पण, सरते शेवटी माझ्या स्टाईलच्या क्रिकेटवर विश्वास ठेवला. आणि कामगिरी फतेह करण्यावर लक्ष केंद्रीत केलं,’ असं शिवम सामना संपल्यानंतर बोलताना म्हणाला.

मोहाली सामन्यात पहिली फलंदाजी करताना अफगाणिस्तानने ५ बाद १५८ धावा केल्या त्या मोहम्मद नाबीच्या ४२ धावांच्या जोरावर. मुकेश कुमार आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी २ बळी टिपले. तर शिवम दुबेनंही (Shivam Dube) एक गडी बाद केला. याला उत्तर देताना भारताने १५९ धावा केल्या त्या ४ गडी गमावत. रोहित (०), शुभमन (२३) आणि तिलक वर्मा (२६) धावांवर बाद झाल्यानंतर शिवम दुबे (Shivam Dube) आणि जितेन शर्मा (३१) यांनी चौथ्या गडयासाठी ४५ धावांची भागिदारी केली. अखेर शिवम ६० आणि रिंकू सिंग १६ धावांवर नाबाद राहिले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.