-
ऋजुता लुकतुके
बंगळुरूमध्ये बुधवारी झालेल्या भारत विरुद्ध अफगाणिस्तान (Ind vs Afg 3rd T20) सामन्यात दोन सुपर ओव्हरनी रंगत आणली खरी. पण, त्यात रोहित शर्माच्या (Rohit Sharma) एका निर्णयामुळे थोडाफार गोंधळही निर्माण झाला. पहिल्या सुपर ओव्हरमध्ये भारताच्या १ बाद १५ धावा झाल्या असताना आणि भारताला उरलेल्या एका चेंडूत विजयासाठी दोन धावांची गरज असताना रोहित शर्मा (Rohit Sharma) मैदानाबाहेर गेला. आणि त्याच्या ऐवजी रिंकू सिंग (Rinku Singh) मैदानात आला.
रोहित मैदानाबाहेर गेला तो खेळाडू बाद धरायचा की, त्याने फक्त निवृत्ती पत्करली असं म्हणायचं, यावरून गोंधळ निर्माण झाला आहे. कारण, या सुपर ओव्हरमध्ये देखील बरोबरी साधल्यावर आणखी एक सुपर ओव्हर घ्यावी लागली. आणि तिथेही रोहित खेळला.
एकच खेळाडू दोन्ही सुपर ओव्हर खेळू शकतो का असा प्रश्न मग चर्चिला जाऊ लागला. इतकंच नाही तर अफगाणिस्तानचे प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट यांनी गुरुवारीही यावर प्रतिक्रिया देताना आम्हाला हा नियम ठाऊक नव्हता असं म्हटलं. त्यामुळे गोंधळ आणखी वाढला.
(हेही वाचा – James Watt : शक्तीला वॅट का म्हणतात? कोणत्या शास्त्रज्ञाच्या नावावरुन हे नाव पडलं?)
Double the drama 🫣
Double the nerves 🥶
All thanks to a Double Super-Over 💥A BTS view of the thriller from the M Chinnaswamy Stadium with #TeamIndia 👌👌
WATCH 🎥🔽 #INDvAFG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/Uy4OAXVTJz
— BCCI (@BCCI) January 18, 2024
म्हणूनच हा नियम आधी समजून घेऊया. रोहित एक चेंडू शिल्लक असताना तंबूत का परतला, याचं उत्तर प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी दिलं आहे. ते म्हणतात, ‘रोहितने परतणं ही धोरणात्मक चाल होती. एकच चेंडू शिल्लक असताना ताज्या दमाचा खेळाडू येऊन तो चपळतेनं गरज पडल्यास २-३ धावा पळेल, यासाठी आम्ही रोहितला माघारी बोलवलं. आणि युवा रिंकू सिंगला (Rinku Singh) पाठवलं,’ असं राहुल द्रविड (Rahul Dravid) सामन्यानंतर बोलताना म्हणाले.
त्यामुळे रोहित का तंबूत परतला याचं उत्तर तर मिळालं. पण, पुढे काय? असं करता येतं का? त्याचे काय नियम आहेत? आणि रोहित दोनदा का खेळला?
सुपर ओव्हरचा नियम इतकंच सांगतो की, त्या एका षटकांत तुम्ही ३ फलंदाज खेळवू शकता. आणि यातील दोन बाद झाले किंवा षटक संपलं तर तुमचा सुपर ओव्हरमधील डाव संपला. मग एखादा फलंदाज तुम्हाला रिटायर आऊट करायचा असेल तर तो तुमचा कौल आहे. थोडक्यात, बंगळुरूमध्ये रोहीत झाला तो रिटायर्ड आऊट.
पण, एखादा फलंदाज दोन सुपर ओव्हर खेळू शकतो का, यावर आयसीसीचा नियम असं सांगतो की, दुसऱ्या म्हणजे प्रतिस्पर्धी संघाची हरकत नसेल तर फलंदाज दुसरी सुपरओव्हरही खेळू शकतो. गोलंदाजाच्या बाबतीत मात्र तसं नाही. गोलंदाज एकच सुपर ओव्हर टाकू शकतो.
(हेही वाचा – Ram Mandir Programme Schedule: अयोध्येत २२ जानेवारी रोजी पाच तास चालणार कार्यक्रम; कसे असेल नियोजन)
त्यामुळे रोहित दोनदा खेळला हे चूक नव्हे. पण, हा नियम तेव्हा अफगाणिस्तानच्या संघ प्रशासनालाही ठाऊक नव्हता, असं त्यांनी सामन्यानंतर कबूल केलं. त्यांनी पहिलं षटक ओमरझाईला दिल्यावर दुसलं फरीदला दिलं. आणि सामन्यानंतर अफगाण प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट यांनी हा नियमच माहीत नसल्याचं कबूल केलं.
‘रोहित पुन्हा फलंदाजीला का आला, यावर आमच्या ड्रेसिंग रुममध्ये चर्चाच झाली नाही. कारण, त्याची आम्ही फारशी चिंता केली नाही. पण, गोलंदाजीचा नियम आम्हालाही पुरेसा माहीत नव्हता. एकाच गोलंदाजाला दुसरी सुपर ओव्हर टाकता येते का किंवा बदललेले गोलंदाजीचे नियम काय आहेत, हे आम्हाला ठाऊक नव्हतं,’ असं ट्रॉट पत्रकार परिषदेत म्हणाला.
What an incredible game! After 2 back to back super overs India won the 3rd T20I and white washed Afghanistan by 3-0! @ImRo45 rewrites history as he smashes his 5th T20I century, @rinkusingh235 ‘s outstanding half century, @Sundarwashi5 and Ravi Bishnoi taking wickets were key… pic.twitter.com/E3MKQlRss4
— Jay Shah (@JayShah) January 17, 2024
आंतरराष्ट्रीय सामन्यांत सुपर ओव्हर दोनदा खेळवण्याची तशीही ही पहिलीच वेळ होती. पण, आयपीएलमध्ये असा प्रसंग पूर्वी घडला आहे. त्यामुळेही संघ प्रशासनाला कदाचित या नियमांची फारशी माहिती नसावी. पण, काही नियम गोंधळात टाकणारे आहेत, अशीची चर्चा आता क्रिकेट वर्तुळात सुरू आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community