-
ऋजुता लुकतुके
बुधवारी बंगळुरू इथं झालेल्या भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी-२० (Ind vs Afg 3rd T20) सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा दुसऱ्या सुपर ओव्हरनंतर थऱारक पराभव केला. आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांत सुपर ओव्हरचा नियम लागू झाल्यानंतर पहिल्यांदाच सामना दुसऱ्या सुपर ओव्हरपर्यंत गेला. त्यामुळे अगदी संघ प्रशासनाचीही काही नियम समजून घेताना भंबेरी उडाली.
अशावेळी सामना दुसऱ्या सुपर ओव्हरपर्यंत गेल्यावर भारतीय डगआऊटमध्ये काय वातावरण होतं, हे दाखवणारा व्हीडिओ बीसीसीआयनेच सोशल मीडियावर शेअर केला आहे. रोहित शर्माने (Rohit Sharma) निर्धारित २० षटकांत भारताला २१२ ची धावसंख्या उभी करून देताना निर्णायक भूमिका बजावली होती. १२१ नाबाद धावा करताना त्याने ८ षटकार आणि ९ चौकार लगावले. त्यानंतर पहिल्या सुपर ओव्हरमध्येही २ षटकार खेचत त्याने धावसंख्या नाबाद १६ वर आणली. पण, रोहित त्यानंतर रिटायर्ड आऊट झाला. आणि पुढच्या एका चेंडूवर एकच धाव निघाली. त्यामुळे धावसंख्या पुन्हा एकदा १६ – १६ अशी बरोबरीतच राहिली. आणि गरज पडली आणखी एका सुपर ओव्हरची.
(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : उत्तर प्रदेशमधील कैद्यांनी बनविले ५१ हजार दिवे, ४० हजार ध्वज)
Double the drama 🫣
Double the nerves 🥶
All thanks to a Double Super-Over 💥A BTS view of the thriller from the M Chinnaswamy Stadium with #TeamIndia 👌👌
WATCH 🎥🔽 #INDvAFG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/Uy4OAXVTJz
— BCCI (@BCCI) January 18, 2024
समालोचन कक्षातून एक समालोचक जोरात ओरडत होता, ‘कुठेही जाऊ नका. आपल्याला आणखी एक सुपर ओव्हर बघायची आहे.’ तर भारतीय डगआऊटमध्ये विक्रम राठोड, राहुल द्रविड आणि पारस म्हांब्रे हे प्रशिक्षक काही क्षण डोक्याला हात लावून बसले होते. पण, रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि खुद्द राहुल द्रविडलाही आयपीएलमध्ये दोन सुपर ओव्हर खेळण्याचा अनुभव होता.
आणि भारतीय डगआऊटमध्ये काही युवा खेळाडूंचीच अशी प्रतिक्रिया होती की, काय घडतंय ते कळतच नव्हतं.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community