IND vs AUS 1st ODI: भारताने टॉस जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय; भेदक माऱ्याने ऑस्ट्रेलिया फलंदाज दबावात

115

IND vs AUS 1st ODI एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धेपूर्वी सध्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ३ सामन्यांची वन डे मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना शुक्रवार, २२ सप्टेंबर रोजी होत आहे. भारताचा कर्णधार के.एल. राहुलने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला, त्यानंतर भारतीय गोलंदाजींच्या भेदक माऱ्याने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर दबाव आला. १२ षटकांत केवळ ५७ धावा करता आल्या.

सध्या IND vs AUS 1st ODI या सामन्याचे नेतृत्व लोकेश राहुल नेतृत्व करत आहे. या सामन्यात विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांना विश्रांती देण्यात आली आहे. या मैदानात लक्ष्याचा पाठलाग करणे सोपे असल्याचे राहुल म्हणाला. या कारणास्तव त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारतीय संघात ५ बदल करण्यात आले आहेत. त्यात ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, आर. अश्विन आणि मोहम्मद शमी यांचा समावेश आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार पॅट कमिन्स याने सांगितले की, “ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल स्टार्क या सामन्यात खेळणार नाहीत. तसेच, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श डावाची सुरुवात करतील आणि स्टीव्ह स्मिथ आजच्या सामन्यात खेळणार आहे. हा सामना भारताने जिंकला तर भारतीय संघ आयसीसी वन डे क्रमवारीतही अव्वल स्थानी पोहोचू शकतो. कसोटी आणि टी२० मध्ये टीम भारत आधीच अव्वल आहे. अशा स्थितीत भारताला आज तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर १ संघ बनण्याची संधी आहे.

(हेही वाचा Women’s Reservation Bill : महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्याबद्दल पंतप्रधानांकडून देशातील महिलांना शुभेच्छा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.