भारताचा पराभव; एकही विकेट न गमावता ऑस्ट्रेलियाचा विजय, मालिकेत बरोबरी

भारतीय संघाला दुसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला आहे. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना केवळ ११७ धावा केल्या. यावेळी भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक ३१ धावा तर अक्षर पटेल व रविंद्र जाडेजाने अनुक्रमे २९ आणि १६ धावा केल्या. याव्यतिरिक्त कोणालाही चांगली खेळी करता आल्या नाहीत.

मिचेल स्टार्कच्या सर्वाधिक ५ विकेट्स

ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज मिचेल स्टार्कने ५३ धावा देत तब्बल ५ विकेट्स घेतल्या आणि अर्ध्या भारतीय संघाला माघारी पाठवले. त्यामुळे ही संपूर्ण मालिका जिंकण्यासाठी भारताला पुढच्या सामन्यात विशेष तयारी करावी लागणार आहे. भारताने दिलेले ११७ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने एकही विकेट न गमावता सहज पूर्ण केले. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे.

(हेही वाचा लालपरी नव्या रुपात; एसटीच्या ताफ्यात येणार स्लीपर बस)

तिसरा सामना निर्णायक

ऑस्ट्रेलियाकडून स्टार्कने ५ तर सिन अबॉटने ३ आणि नॅतन एलिसने २ विकेट्स घेतल्या. भारताने आजचा सामना जिंकला असता तर मालिकाविजयाची संधी भारताकडे होती परंतु आता दोन्ही संघ मालिकेत १-१ अशा बरोबरीत असून तिसरा सामना निर्णायक असणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here