IND vs AUS 2nd T20 : ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, भारताची २ – ० ने आघाडी

भारताच्या गोलंदांजांची जादू

174
IND vs AUS 2nd T20 : ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, भारताची २ - ० ने आघाडी

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघ (IND vs AUS 2nd T20) आता त्यांच्या पुढच्या मालिकेसाठी सज्ज झाला आहे. भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया संघ यांच्यामध्ये एकूण ५ टी – २० सामन्यांची मालिका होणार असून पहिल्या दोन सामन्यांवर भारतीय संघाने आपले नाव कोरले आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील (IND vs AUS 2nd T20) दुसरा सामना रविवार २६ नोव्हेंबर रोजी तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात आला. यावेळी भारताने ४४ धावांनी ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला.

भारताच्या गोलंदांजांची जादू

भारताकडून रवी बिश्नोई आणि प्रसीध कृष्णाने (IND vs AUS 2nd T20) प्रत्येकी ३ बळी घेतले. यादरम्यान बिश्नोईने ४ षटकात ३२ धावा आणि कृष्णाने ४ षटकात ४१ धावा दिल्या. याशिवाय अर्शदीप सिंग, मुकेश कुमार आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी १ यश मिळाले.

(हेही वाचा – Nashik Rain : नाशिकमध्ये वादळी वारे, अवकाळी पाऊस आणि गारपीट; कांदा, द्राक्ष पिकांचे नुकसान)

असा रंगला सामना –

टाॅप ३ फलंदाजांनी केलेल्या तुफानी फटकेबाजीने (IND vs AUS 2nd T20) ऑस्ट्रेलियासमोर दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने २३६ धावांचे आव्हान दिले. यशस्वी जैस्वालने ५३ धावांमध्ये अर्धशतक झळकावले. तर ईशान किशनने देखील ५२ धावंची खेळी केली. सूर्याने १० चेंडूत २ षटकारांच्या मदतीने १९ धावांची खेळी केली. तर रिंकू सिंग आणि तिलक वर्मा नाबाद परतले. रिंकू सिंगने ९ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३१ धावांची नाबाद खेळी केली आणि तिलक वर्मा २ चेंडूत १ षटकाराच्या मदतीने ७ धावांवर नाबाद राहिला. (IND vs AUS 2nd T20)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.