Ind vs Aus T20 : यशस्वी जयसवालच्या यशाचा मंत्र 

यशस्वी जयसवाल ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० मालिकेत तडाखेबंद फलंदाजी करतोय आणि त्या माध्यमातून भारतीय संघाचे दरवाजेही तो ठोठावतोय. 

100
Ind vs Aus T20 : यशस्वी जयसवालच्या यशाचा मंत्र 
Ind vs Aus T20 : यशस्वी जयसवालच्या यशाचा मंत्र 
  • ऋजुता लुकतुके

यशस्वी जयसवाल (yashasvi jaiswal) ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० (Ind vs Aus T20) मालिकेत तडाखेबंद फलंदाजी करतोय आणि त्या माध्यमातून भारतीय संघाचे दरवाजेही तो ठोठावतोय. (Ind vs Aus T20)

भारताचा ताज्या दमाचा सलामीवीर यशस्वी जयसवाल (yashasvi jaiswal) ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत तडाखेबाज फलंदाजी करतोय. थीरुअनंतपुरममधील सामन्यात त्याच्या २३ चेंडूंत केलेल्या ५३ धावांच्या खेळीमुळेच भारताला ऑस्ट्रेलियासमोर २३६ धावांचं आव्हान ठेवता आलं. आपल्या या कामगिरीचं श्रेय यशस्वीने बेडर खेळ करण्याच्या क्षमतेला दिलं आहे. (Ind vs Aus T20)

‘बेडर होऊन फलंदाजी करणं हा माझा स्वाभाविक गुणधर्म आहे आणि मैदानावर मी तसाच वागतो. याच स्वभावामुळे मला आतापर्यंत यश मिळालं आहे,’ असं यशस्वी सामन्यानंतर पत्रकारांना बोलताना म्हणाला. क्रिकेट शिकताना जे फटके मारायला शिकलो, त्याचा पूर्ण वापर सामन्यात करणं ही एकमेव रणनीती असल्याचंही तो आत्मविश्वासाने म्हणाला. (Ind vs Aus T20)

त्याचबरोबर संघाचे प्रशिक्षक व्ही व्ही एस लक्ष्मण (VVS Laxman) आणि कर्णधार सुर्यकुमार यादव (Captain Suryakumar Yadav) यांचेही यशस्वीने आभार मानले. ‘दोघांनी नैसर्गिक खेळ करण्याचं स्वातंत्र मला दिलं. उलट माझ्याकडून तीच अपेक्षा केली. त्यामुळे मी माझ्यावर विश्वास ठेवू शकलो,’ असं यशस्वी म्हणाला. यशस्वीने अबॉटच्या एकाच षटकात २४ धावा वसूल केल्या. (Ind vs Aus T20)

(हेही वाचा – Pakistan : अणुयुद्धात सगळा हिंदू धर्म संपेल, मुसलमान नाही; कारण जगभरात ५७ मुस्लिम राष्ट्रे; पाकच्या संरक्षण तज्ज्ञाने तोडले अकलेचे तारे )

त्याचबरोबर क्रिकेटमधील नवीन फटके शिकणं आणि मनोधैर्य वाढवणं यावर काम करत असल्याचं त्याने स्पष्ट केलं. (Ind vs Aus T20)

कर्णधार सुर्यकुमार यादवने (Captain Suryakumar Yadav) यशस्वी बरोबरच पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या रिंकू सिंगचंही कौतुक केलं आहे. दोघांच्या फलंदाजीमुळे संघाला स्थिरता येत असल्याचं त्याने बोलून दाखवलं. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळत असून पहिले दोन सामने जिंकून संघ २-० असा आघाडीवर आहे. तिसरा टी-२० सामना २९ तारखेला गुवाहाटीत होणार आहे. (Ind vs Aus T20)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.