भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना राजकोटमध्ये खेळला जात आहे. (Ind vs Aus 3rd ODI) ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने बुधवारी राजकोट येथे तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेत भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने पहिले दोन वनडे जिंकून २-० अशी अभेद्य आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी ऑस्ट्रेलियाला दमदार सुरुवात करून दिली. वॉर्नर ५६ धावांची इनिंग खेळून बाद झाला. त्यानंतर मार्शचे अवघ्या ४ धावांनी शतक हुकले. स्टीव्ह स्मिथ ६१ चेंडूत ७४ धावा केल्या. त्याला मोहम्मद सिराजने बाद केले. त्याचबरोबर मार्नस लाबुशेन ८ चेंडूत १२ धावांवर खेळत आहे. ऑस्ट्रेलिया संघाने ३१ षटकांनंततर ३ बाद २३७ धावा केल्या आहेत. अशा प्रकारे ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना यथेच्छ चोपले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्याचा वचपा ऑस्ट्रेलियाने या सामन्यात काढला आहे, असेच दिसून येत आहे. सध्या ऑस्ट्रेलियाची स्थिती ६ बाद ३१७ धावा अशी आहे. मार्नस लाबुशेन याने अर्धशतकी खेळी केली आहे. ऑस्ट्रेलियाची मोठ्या धावसंख्याकडे वाटचाल चालू आहे. (Ind vs Aus 3rd ODI)
(हेही वाचा – ISRO Shukrayaan : इस्त्रो आता ‘शुक्रयान’ मोहिमेसाठी सज्ज; शुक्रावरील वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी नवीन मोहीम)
त्यानंतर मात्र अॅलेक्स कॅरीला बाद करत बुमराहने भारताला मिळवून दिले चौथे यश मिळवून दिले. जसप्रीत बुमराहने धोकादायक मॅक्सवेलचा त्रिफाळा उडवला. कॅमरुन ग्रीनच्या रुपाने ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का बसला आहे. सध्या ऑस्ट्रेलियाची स्थिती ६ बाद ३१७ धावा अशी आहे.
स्टीव्ह स्मिथचा पराक्रम
डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी ऑस्ट्रेलियाला दमदार सुरुवात करून दिली. वॉर्नर ५६ धावांची इनिंग खेळून बाद झाला. त्यानंतर मार्शचे अवघ्या ४ धावांनी शतक हुकले. या दरम्यान स्टीव्ह स्मिथने राजकोट वनडेत एक मोठा पराक्रम केला आहे. स्टीव्ह स्मिथने राजकोट वनडेमध्ये ५००० वनडे धावा पूर्ण केल्या आहेत. स्टीव्ह स्मिथ ५ हजार धावा पूर्ण करणारा १७वा ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरला आहे. तसेच, सर्वात जलद ५ हजार करणारा तो चौथा ऑस्ट्रेलियन बनला आहे. त्याने १२९ एकदिवसीय डावात हा पराक्रम केला. स्मिथच्या आधी डीन जोन्सने १२८ डावांत ५ हजार धावा पूर्ण केल्या होत्या. सर्वात जलद पाच हजार धावा पूर्ण करणारा ऑस्ट्रेलियन फलंदाज डेव्हिड वॉर्नर आहे. त्याने ११५ डावात ही कामगिरी केली. अॅरॉन फिंचने १२६ डावात ही कामगिरी केली. (Ind vs Aus 3rd ODI)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community