IND vs AUS 3rd ODI : ऑस्ट्रेलियाने बाजू सावरली; शेवटच्या सामन्यात भारताचा 66 धावांनी पराभव

137
IND vs AUS 3rd ODI : ऑस्ट्रेलियाने बाजू सावरली; शेवटच्या सामन्यात भारताचा 66 धावांनी पराभव
IND vs AUS 3rd ODI : ऑस्ट्रेलियाने बाजू सावरली; शेवटच्या सामन्यात भारताचा 66 धावांनी पराभव

राजकोट वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ६६ धावांनी पराभव केला. (IND vs AUS 3rd ODI) ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना सात विकेटच्या मोबदल्यात ३५२ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर भारतीय संघाला २८६ धावांत रोखले. भारताने अखेरचा सामना गमावला असला, तरी मालिकेत २-१ च्या फरकाने विजय मिळवला आहे.

(हेही वाचा – RAW : माजी ‘रॉ’ संचालकांच्या ‘भारत के अंदरूनी शत्रू’ पुस्तकामधून देशाबाहेरील आणि देशांतर्गत शत्रूंचा पर्दाफाश)

शेवटचा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कपआधी लाज राखली आहे. त्याचबरोबर टीम इंडियाने 2-1 ने मालिका खिशात घातली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्याचा वचपा ऑस्ट्रेलियाने या सामन्यात काढला आहे, असेच दिसून येत आहे. (IND vs AUS 3rd ODI)

प्रथम फलंदाजीसाठी आल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने आक्रमक सुरूवात करून दिली. त्याने आपले 53 वे अर्धशतक पूर्ण केले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्यापासून रोहित फक्त तीन सिक्स दूर आहे. रोहितने आजच्या सामन्यात सहा सिक्स मारत करिअरमधील ५५० सिक्स पूर्ण केले आहेत. या यादीमध्ये पहिल्या स्थानावर ख्रिस गेल असून त्याचे ५५३ सिक्स आहेत. या दरम्यान स्टीव्ह स्मिथने राजकोट वनडेत एक मोठा पराक्रम केला आहे. स्टीव्ह स्मिथने राजकोट वनडेमध्ये ५००० वनडे धावा पूर्ण केल्या आहेत. स्टीव्ह स्मिथ ५ हजार धावा पूर्ण करणारा १७वा ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरला आहे. (IND vs AUS 3rd ODI)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.