सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने (IND vs AUS 4th T20) सध्याच्या विश्वचषक विजेत्या संघाला पराभूत करत पाच सामन्यांच्या मालिकेत ३ – १ अशी विजयी आघाडी घेतली आहे.
भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया संघ यांच्यामध्ये एकूण ५ टी – २० सामन्यांची मालिका (IND vs AUS 4th T20) सुरु असून तीन सामन्यांवर भारतीय संघाने तर एका सामन्यावर ऑस्ट्रेलिया संघाने आपले नाव कोरले आहे. त्यामुळे भारताने ३ – १ या फरकाने या मालिकेवर विजय मिळवला आहे.
(हेही वाचा – Unseasonal Rain : पुढील २४ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज)
शुक्रवार १ डिसेंबर रोजी भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध (IND vs AUS 4th T20) चौथा टी २० सामना खेळला गेला. शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियम, रायपूर येथे झालेल्या सामन्यात भारताने २० धावांनी विजय मिळवला आहे.
India complete dominant win to take series honours 👏#INDvAUS 📝: https://t.co/iSiPC0Iwy6 pic.twitter.com/WPMQ6fSrSW
— ICC (@ICC) December 1, 2023
असा रंगला सामना
रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला फलंदाजीसाठी बोलावले. येथे भारतीय (IND vs AUS 4th T20) सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी ५० धावा जोडल्या. या एकूण धावसंख्येवर यशस्वी (३७) बाद झाला आणि त्यानंतर भारताने श्रेयस अय्यर (८) आणि कर्णधार सूर्यकुमार यादव (१) यांची झटपट विकेट गमावली. भारतीय संघाने ६३ धावांत तीन विकेट गमावल्या होत्या. मात्र नंतर रिंकू सिंहसह ऋतुराज गायकवाडने डावाची धुरा सांभाळली. गायकवाडही ३२ धावा करून बाद झाला तेव्हा रिंकू आणि जितेश शर्मा यांनी डाव पुढे नेला. दोघांनी ३२ चेंडूत ५६ धावांची जलद भागीदारी केली.
(हेही वाचा – Pollution Safety Tips : आरोग्यावरील प्रदूषणाचे दुष्परिणाम टाळायचेत ; करा या उपायांचा अवलंब)
अक्षर पटेल (०), रिंकू सिंग (४६), दीपक चहर (०) आणि रवी बिश्नोई (१) पॅव्हेलियनमध्ये परतले. अशाप्रकारे भारतीय संघाला निर्धारित २० षटकात ९ गडी गमावून केवळ १७४ धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून बेन द्वारशियसने ४ षटकात ४० धावा देत ३ बळी घेतले. बेहरेनडॉर्फ आणि तनवीर संघालाही २-२ बळी मिळाले. अॅरॉन हार्डीनेही एक विकेट घेतली. (IND vs AUS 4th T20)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community