ऋजुता लुकतुके
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० मालिकेत भारतीय संघाने रायपूरमधील सामना जिंकून टी-२० क्रिकेटच्या इतिहासात सर्वात यशस्वी संघ होण्याचा मान मिळवला आहे. भारतीय टी-२० संघाने सर्वाधिक विजयांचा नवा विक्रम रचला आहे. रायपूरमधील विजय भारतीय संघाचा १३६ वा विजय होता.
२००६ साली भारतीय संघ पहिला टी-२० सामना खेळला होता. आणि तेव्हापासून खेळलेल्या २१३ सामन्यांपैकी १३६ सामने भारताने जिंकले आहेत. ६४ सामन्यांत भारताचा पराभव झाला आहे. आणि ३ सामने अनिर्णित राहिले आहेत. भारतीय संघाची यशाची टक्केवारी ६३.८४ टक्के इतकी आहे. यापूर्वी पाकिस्तान संघाने २३६ पैकी १३५ सामने जिंकले होते. आणि सर्वाधिक विजयांचा विक्रम त्यांच्या नावावर होता.
(हेही पहा-Mumbai Municipal Corporation : महापालिकेच्या उद्यानांमध्ये मधल्या सुट्टीत करता येणार फोटोशुट)
पाकिस्तान नंतर २०० पैकी १०२ सामने जिंकून न्यूझीलंडचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. तर दक्षिण आफ्रिकेनं १७१ पैकी ९५ सामने जिंकले आहेत. त्यांचा संघ चौथ्या स्थानावर आहे.
Insert tweet –
A special win in Raipur 👏#TeamIndia now has the most wins in Men’s T20Is 🙌#INDvAUS | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/edxRgJ38EG
— BCCI (@BCCI) December 1, 2023
शुक्रवारी रायपूरमध्ये खेळपट्टी काहीशी संथ आणि त्यामुळे गोलंदाजांना साथ देणारी होती. अशावेळी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला पहिली फलंदाजी दिली. आणि यशस्वी जयसवाल (३७), ऋतुराज गायकवाड (३२), जितेश शर्मा (३५) आणि रिंकू सिंगच्या ४५ धावांच्या जोरावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी १७५ धावांचं आव्हान समोर ठेवलं. ऑस्ट्रेलियातर्फे तन्वीर सांगा आणि जेसन बेहरेनडॉर्फ यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
याला उत्तर देताना ऑस्ट्रेलियाचे फलंदाज भारतीय फिरकीच्या जाळ्यात अडकले. ट्रेव्हिस हेड (३१) आणि कर्णधार मॅथ्यू वेड (नाबाद ३६) यांचा अपवाद वगळता एकही फलंदाज खेळपट्टीवर स्थिरावू शकला नाही. ठरावीक अंतराने गडी बाद होत गेले आणि भारताने २० धावांनी विजय साकारला. अक्षर पटेलने ४ षटकांत अवघ्या १६ धावा देत ३ बळी टिपले. त्यालाच सामनावीराचा पुरस्कार मिळाला.
Insert tweet –
The moment #TeamIndia recorded their third win of the series 👌
Celebrations and smiles all around in Raipur 😃#INDvAUS | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/BxRiBbSzCz
— BCCI (@BCCI) December 1, 2023
रवी बिश्नोई आणि दीपक चहर यांनी अक्षरला चांगली साथ दिली. भारतीय संघ आता मालिकेत ३-१ असा आघाडीवर आहे. आणि मालिकेतील शेवटचा टी-२० सामना रविवारी बंगळुरूच्या चिन्नास्वामी मैदानावर होणार आहे.
(हेही पहा-https://www.youtube.com/watch?v=RnH3Aa0mmCI)
Join Our WhatsApp Community