-
ऋजुता लुकतुके
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानचा चौथा टी-२० सामना रायपूरला पार पडला. पण, एका धक्कादायक बातमीनुसार, वीज बिल न भरल्यामुळे स्टेडिअमचा पुरवठाच कापलेला होता. अखेर जनरेटरवर हा सामना खेळवावा लागला. (Ind vs Aus 4th T-20)
रायपूरमध्ये झालेला भारत वि. ऑस्ट्रेलिया चौथा टी-२० सामना हा इमर्जन्सी दिव्यांवर खेळवण्यात आल्याचं आता उघड झालं आहे. शहीद वीर नारायण सिंग स्टेडिअमचा नियमित वीज पुरवठा पाच वर्षांपूर्वीच बंद करण्यात आला आहे. कारण, त्यांनी ३.१ कोटी रुपयांचं वीज बिल थकवलं आहे. (Ind vs Aus 4th T-20)
छत्तीसगड राज्य क्रिकेट संघटनेनं ऐन वेळी जनरेटरने विद्युत पुरवठ्याची सोय करून हा सामना कसाबसा पार पाडला आहे. त्यासाठी संघटनेला १.४ कोटी रुपयांचा खर्च करावा लागला. विद्युत दिव्यांच्या मदतीने क्रिकेट सामना आयोजित करायचा झाल्यास फक्त फ्लडलाईट्ससाठी ६०० किलोवॅट इतकी वीज लागते. तर स्टेडिअमची इतर विजेची गरज ४३५ किलोवॅट इतकी आहे. (Ind vs Aus 4th T-20)
(हेही वाचा – Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस २००४ मध्ये भाजपसोबत युती करणार होती; शरद पवारांची कबुली)
क्रिकेट वर्तुळात या प्रकारामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. छत्तीसगडमधील हे स्टेडिअम पब्लिक वर्क्स विभागाने बांधलेलं आहे. आणि नंतर त्यांनी ते राज्याच्या क्रीडा खात्याकडे सुपूर्द केल्याचं या विभागाचं म्हणणं आहे. आणि या दोन विभागांमध्ये वीज बिल कुणी भरायचं यावरून काही वर्षं वाद सुरू आहे. अखेर २०१८ मध्ये ३.१४ कोटी रुपयांची थकबाकी असताना या स्टेडिअमचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. (Ind vs Aus 4th T-20)
त्यानंतर इथं ३ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने झाले आहेत आणि प्रत्येक वेळी छत्तीसगड क्रिकेट संघटनेनं वीज मंडळाकडे तात्पुरती विनंती करून वीज पुरवठा तात्पुरता सुरू करून घेतला आहे. आणि अतिरिक्त विजेची गरज संघटनेनं कायमच जनरेटर वापरून पूर्ण केली आहे. यावेळीही त्यांनी वीज मंडळाकडे १००० किलोवॅट विजेची मागणी केली होती. पण, वीज मंडळाने २०० केव्ही इतकात पुरवठा देऊ केला. त्यामुळे अख्खे फ्लडलाईट्स जनरेटरवर चालवावे लागले. (Ind vs Aus 4th T-20)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community