Ind vs Aus, Brisbane Test : ‘तुझे सगळे क्रिकेटचे फटके खिशात घालून ठेव’; गावस्करांनी शुभमन गिलला का सुनावलं?

Ind vs Aus, Brisbane Test : शुभमन गिल चुकीचा फटका खेळून झटपट बाद झाला होता. 

74
Ind vs Aus, Brisbane Test : ‘तुझे सगळे क्रिकेटचे फटके खिशात घालून ठेव'; गावस्करांनी शुभमन गिलला का सुनावलं?
  • ऋजुता लुकतुके

दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर या मालिकेत भारतीय फलंदाजांचा दृष्टिकोन आणि त्यांची फटक्यांची निवड यावर चिडले आहेत. विराट कोहलीच्या डोक्यातील तिढा सुटला, की त्याची फलंदाजी नियमित होऊ शकेल, असं म्हणतानाच इतर फलंदाजांवर मात्र गावस्कर यांनी टीका केली आहे. खासकरून यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल हे युवा फलंदाज चुकीचे फटके खेळून बाद झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. शुभमन गिलला तर त्यांनी, ‘तुझे फटके तुझ्या खिशात घालून ठेव. आम्हाला दाखवू नकोस,’ या भाषेत सुनावलं आहे. (Ind vs Aus, Brisbane Test)

(हेही वाचा – One Nation One Election : एक देश एक निवडणूक विधेयक लोकसभेत मंजूर)

गिलने पहिल्या डावात उजव्या यष्टीबाहेरून जाणारा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न केला आणि मिचेल मार्शने गलीत त्याचा सुरेख झेल पकडला. चेंडू हवेत ठेवण्याची चूक गिलला नडली. ‘तुम्ही डाव नवीन सुरू करता, तेव्हा काही फटके तुमचा घात करू शकतात. ते खेळायचे नाहीत हे साधं गणित आहे. अशावेळी फलंदाजाने अवसानघातकी खेळ करू नये. तो फटका गिलने मारायलाच नको होता. ड्रेसिंग रुममध्ये तुम्ही एखाद्या फटक्यासाठी ओळखले जात असलात, तरी मैदानावर अशी ओळख विसरून खेळायचं असतं. परिस्थितीनुसार खेळण्यात भारतीय फलंदाज कमी पडले. पुढे असे फटके खिशात ठेवून दे, असं मला गिलला सांगायला आवडेल,’ असं गावस्कर स्पष्टपणे म्हणाले. (Ind vs Aus, Brisbane Test)

(हेही वाचा – ‘One Nation, One Election’ विधेयक लोकसभेत सादर)

विराटसाठी मात्र त्यांनी वेगळा सल्ला दिला. सचिनच्या सिडनीतील खेळीचा आदर्श समोर ठेवण्याचा सल्ला त्यांनी विराटला दिला. ‘सचिन एका विशिष्ट फटक्यावर बाद होत होता. तेव्हा त्याने २४१ धावांच्या मॅरेथॉन खेळीत तो फटका एकदाही खेळला नव्हता. हा संयम विराटने आता दाखवण्याची गरज आहे. कोहली सचिनला आपला हीरो मानतो. त्याने हीरोसारखं खेळावं,’ असं सुनील गावस्कर म्हणाले. भारतीय संघाला ब्रिस्बेन कसोटी वाचवायची असेल तर त्यांना उर्वरित दिवस खेळून काढावे लागतील आणि फलंदाजांसमोर हा कसोटीचा क्षण आहे. (Ind vs Aus, Brisbane Test)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.