Ind vs Aus, Brisbane Test : पाऊस आणि अपुऱ्या प्रकाशामुळे अखेर ब्रिस्बेन कसोटी अनिर्णित, मालिका १-१ बरोबरीत

Ind vs Aus, Brisbane Test : ब्रिस्बेन कसोटीत पाऊसच विजेता ठरला आहे

20
Ind vs Aus, Brisbane Test : पाऊस आणि अपुऱ्या प्रकाशामुळे अखेर ब्रिस्बेन कसोटी अनिर्णित, मालिका १-१ बरोबरीत
Ind vs Aus, Brisbane Test : पाऊस आणि अपुऱ्या प्रकाशामुळे अखेर ब्रिस्बेन कसोटी अनिर्णित, मालिका १-१ बरोबरीत
  • ऋजुता लुकतुके

ब्रिस्बेन कसोटीच्या पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाने ७ बाद ८७ धावांवर दुसरा डाव घोषित करून भारतासमोर ५३ षटकांत २७५ धावा करण्याचं आव्हान समोर ठेवलं. त्यामुळे सामन्यात रंगत निर्माण झाली असतानाच अपुरा प्रकाश आणि पावसामुळे खेळ थांबवावा लागला आहे. चहापानीनंतर लगेचच दोन्ही संघांनी कसोटी अनिर्णित राहिल्याचं मान्य केलं आहे. ब्रिस्बेनमध्ये संध्याकाळच्या सत्रात जोरदार पाऊस आणि वीजेची शक्यता आहे. ब्रिस्बेन कसोटी अनिर्णित राहिल्यावर आता मालिकाही १-१ अशी बरोबरीत आहे. (Ind vs Aus, Brisbane Test)

(हेही वाचा- फडणवीस-शिंदे यांना खोट्या प्रकरणात अडकविण्याचा प्रयत्न; ‘त्या’ क्लिपची SIT चौकशीची घोषणा – Shambhuraj Desai)

ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात १५२ धावा करणारा ट्रेव्हिस हेडला सामनावीर घोषित करण्यात आलं आहे. या मालिकेत हेड हा भारतासाठी डोकेदुखी ठरला आहे. २ शतकं आणि एका अर्धशतकासह आक्रमक फलंदाजी करत त्याने गोलंदाजांना सतावलं आहे. ब्रिस्बेन कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून हेड आणि स्टिव्ह स्मिथ यांनी शतकं साजरी केली. तर ॲलेक्स केरीनेही मौल्यवान ७७ धावा केल्या. तर भारताकडून के. एल. राहुल (८४) आणि रवींद्र जडेजा (७७) यांच्या अर्धशतकांबरोबरच आकाशदीप आणि जसप्रीत बुमराह यांनी फॉलो ऑन टाळण्यासाठी शेवटच्या जोडीसाठी केलेली ४७ धावांची भागिदारी मौल्यवान ठरली. बुमराने सामन्यात ८ बळीही मिळवले. (Ind vs Aus, Brisbane Test)

मालिकेतील चौथी कसोटी आता २६ डिसेंबरपासून मेलबर्न इथं होणार आहे. ऑस्ट्रेलियन संघातील महत्त्वाचा तेज गोलंदाज जोश हेझलवूड या कसोटीला दुखापतीमुळे मुकणार आहे. तर आघाडीच्या फळीचं अपयश यजमान देशाला सलत आहे. उलट भारताला फलंदाजीतील अनेक त्रुटी दूर करायच्या आहेत. रोहित आणि विराट हे अव्वल फलंदाज सातत्याने अपयशी ठरत आहेत. जयसवाल, गिलच्या कामगिरीतही सातत्य नाही. त्यामुळे उर्वरित दोन कसोटींत भारतीय संघाला आपला खेळ उंचवावा लागणार आहे.  (Ind vs Aus, Brisbane Test)

(हेही वाचा- Ind vs Aus, Brisbane Test : कसोटीत फॉलो ऑनचा नियम नेमकं काय सांगतो?)

आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम फेरी गाठण्याच्या दृष्टीने ही मालिका जिंकणं भारतासाठी अत्यावश्यक आहे. (Ind vs Aus, Brisbane Test)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.