Ind vs Aus, Brisbane Test : ब्रिस्बेन कसोटीत पहिल्या डावांत भारतीय फलंदाजी पुन्हा ढेपाळली

Ind vs Aus, Brisbane Test : पावसामुळे तिसऱ्या दिवशी फक्त एका सत्राचा खेळ होऊ शकला.

77
Ind vs Aus, Brisbane Test : ब्रिस्बेन कसोटीत पहिल्या डावांत भारतीय फलंदाजी पुन्हा ढेपाळली
  • ऋजुता लुकतुके

ब्रिस्बेन कसोटीत भारताला पुन्हा एकदा फलंदाजीने दगा दिला आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ४४५ धावांत गुंडाळल्यानंतर पावसाने वारंवार व्यत्यय आणलेल्या दिवशी भारताने पहिल्या डावांत ४ बाद ५१ ची मजल मारली आहे. यशस्वी जयस्वाल (४), शुभमन गिल (१), विराट कोहली (३) आणि रिषभ पंत (९) हे पहिले चार फलंदाज १७ षटकांतच बाद झाले आहेत. विराट कोहलीला पुन्हा एकदा यष्टीबाहेरून जाणारा चेंडू टोलवण्याची खोड नडली. जोश हेझलवूडच्या गोलंदाजीवर कोहली यष्टीरक्षकाकडे झेल देऊन बाद झाला. (Ind vs Aus, Brisbane Test)

महत्त्वाचं म्हणजे भारतीय संघ अजूनही ३९७ धावांनी पिछाडीवर आहे आणि कसोटीचे दोन दिवस अजून बाकी आहेत. त्यामुळे निदान ही कसोटी वाचवण्यासाठी भारतीय फलंदाजांना उर्वरित दोन दिवस खेळून काढावे लागणार आहेत. बाकी कसोटीवर ऑस्ट्रेलियाचंच वर्चस्व आहे. के. एल. राहुल ३३ तर रोहित शर्मा शून्यावर खेळत आहेत. (Ind vs Aus, Brisbane Test)

(हेही वाचा – India-Pakistan War : १६ डिसेंबरला मिळवला होता भारताने पाकिस्तानवर विजय… जाणून घेऊया संक्षिप्त इतिहास)

७ बाद ४०५ धावसंख्येवरून सोमवारी ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव सुरू केल्यावर उर्वरित ३ फलंदाज फक्त ४० धावांचीच भर घालू शकले. सगळ्यात आधी पॅट कमिन्सला मोहम्मद सिराजने २० धावांवर बाद केलं. त्यानंतर मिचेल स्टार्कला बुमराहने १८ धावांवर बाद केलं आणि फटकेबाजी करणारा ॲलेक्स केरी ७० धावांवर बाद झाल्यावर ऑस्ट्रेलियन आव्हान संपलं. पण, सोमवारी पावसाचा वारंवार व्यत्यय येत होता. त्यामुळे खेळपट्टीही दमट झाली होती. तेज गोलंदाजांना साथ देणारी होती आणि खेळणंही अवघड जात होतं. त्याचा फटका पुन्हा एकदा भारताच्या आघाडीच्या फळीला बसला. भारताचे ४ फलंदाज २० षटकांतच माघारी परतले. (Ind vs Aus, Brisbane Test)

आज दिवसभरात फक्त ३७ षटकांचा खेळ शक्य झाला आणि यात ८ बळी गेले. भारतीय संघ मात्र कसोटीत चांगलाच बॅकफूटवर गेला आहे. आता उर्वरित दोन दिवस खेळून काढत कसोटी अनिर्णित राखण्याचं आव्हान भारतासमोर आहे. तर आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने ही कसोटी गमावून भारताचं आव्हान खडतर होणार आहे. तर ऑस्ट्रेलियाला या कसोटीनंतर आणखी एक विजय अंतिम फेरी गाठण्यासाठी पुरेसा ठरणार आहे. (Ind vs Aus, Brisbane Test)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.