Ind vs Aus, Brisbane Test : माजी महिला क्रिकेटपटू ईसा गुहाने मागितली बुमराहची जाहीर माफी

Ind vs Aus, Brisbane Test : समालोचन करताना गुहाने बुमराहवर वांशिक शेरेबाजी केली होती.

78
Ind vs Aus, Brisbane Test : माजी महिला क्रिकेटपटू ईसा गुहाने मागितली बुमराहची जाहीर माफी
  • ऋजुता लुकतुके

ब्रिस्बेन कसोटीत समालोचन करताना माजी इंग्लिश महिला खेळाडू ईसा गुहाने जसप्रीत बुमराहचा ‘मोस्ट व्हॅल्युएबल प्रायमेट,’ असा उल्लेख केल्यामुळे तिच्यावर टीका होत होती. पण, आता ईसाने बुमराहची जाहीर माफी मागितली आहे. पण, यामुळे २००८ च्या मंकीगेट प्रकरणाची आठवण पुन्हा एकदा ताजी झाली आहे. ‘प्रायमेट’ हे एक प्रकारचं वानर आहे. आणि गौरवर्णीय लोक कृष्णवर्णीयांना हिणवताना या शब्दाचा वापर करायचे. त्यावरून गुहाने वांशिक शेरेबाजी केल्याचा आरोप तिच्यावर होत होता.

ब्रिस्बेन कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात, बुमराहने मॅकस्विनी आणि उस्मान ख्वाजा यांचे बळी झटपट मिळवले. त्यावरून समालोचन कक्षात चर्चा सुरू असताना हा प्रकार घडला. ईसा गुहा फॉक्स न्यूज वाहिनीच्या समालोचकांच्या ताफ्यातील सदस्य आहे. ब्रेट ली आणि ईसा गुहा तेव्हा बुमराहच्या कामगिरीवर चर्चा करत होते. (Ind vs Aus, Brisbane Test)

(हेही वाचा – “मी नाराज…”, मंत्रिपदापासून वंचित ठेवल्यानंतर Chhagan Bhujbal स्पष्टच बोलले)

ब्रेट ली – ‘आज बुमराहने ५ षटकं टाकली आणि ४ धावा देत २ बळी मिळवले. माजी कर्णधाराकडून तुम्हाला अशी कामगिरी अपेक्षित आहे.’

ईशा गुहा – ‘तो एमव्हीपी आहे, नाही का? मोस्ट व्हॅल्युएबल प्रायमेट म्हणजे जसप्रीत बुमराह. त्याच्याविषयी आणखी काय सांगू?’

हा संवाद क्षणार्धात लोकांमध्ये पोहोचला आणि सोशल मीडियावर ईसा गुहावर टीकेची झोड उठली. अनेकांना २००८ च्या मंकीगेट प्रकरणाची आठवण झाली. या दौऱ्यात हरभजन सिंगने अँड्र्यू सायमंड्सवर वांशिक शेरेबाजी केल्याचा आरोप ऑस्ट्रेलियन संघाने केला होता. (Ind vs Aus, Brisbane Test)

(हेही वाचा – सोनिया गांधींनी नेहरूंची वैयक्तिक पत्रे परत करावी; Pradhanmantri Sangrahalaya ने पाठवले पत्र)

नेमका संवाद काय झाला होता ते आधी पाहूया,

(हेही वाचा – One Nation One Election विधेयक लोकसभेत स्थगित; राज्यसभेत होणार दोन दिवस विशेष चर्चा)

हा संवाद व्हायरल झाल्यानंतर ईसा गुहाने जसप्रीत बुमराची माफी मागितली आहे. ‘रविवारी समालोचन कक्षात बोलताना मी असा शब्द वापरला, ज्याचे अनेक अर्थ होतात. खरंतर मला बुमराहची अतीव स्तुती करायची होती. पण, चुकीचा शब्द वापरला गेला हे मी मान्य करते. दुसऱ्याचा सन्मान करण्याची शिकवणच मला मिळाली आहे आणि तो शब्द वापरल्याबद्दल मी जाहीर माफी मागते,’ असं विधान ईसा गुहाने केलं आहे. ईसाने फॉक्स न्यूजवर बोलतानाही दिलगिरी व्यक्त केली आहे. (Ind vs Aus, Brisbane Test)

ईसा गुहा हे बोलत असताना रवी शास्त्रीही तिथे होते आणि जाहीरपणे टीव्हीवर माफी मागितल्याबद्दल त्यांनी ईसाचं कौतुक केलं.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.