-
ऋजुता लुकतुके
पावसाने व्यत्यय आणलेली ब्रिस्बेन कसोटी पाचव्या दिवशी रंगतदार वळणावर आहे. भारताचा पहिला डाव २६० धावांवर आटोपल्यावर ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव ७ बाद ८७ धावांवर धोषित केला आहे. त्यामुळे उर्वरित किमान ४६ षटकांत विजयासाठी २७५ धावा करण्याचं आवाहन भारतासमोर आहे. ऑस्ट्रेलियन संघाने पुन्हा एकदा आपला लढाऊ बाणा दाखवून दिला आहे. आणि भारतीय फलंदाजांसमोर नवीन चेंडूला खेळण्याचं आव्हान पुन्हा एकदा उभं राहिलं आहे. (Ind vs Aus, Brisbane Test)
(हेही वाचा- Oath ceremony: मंत्री होण्यासाठी मतदान केलेले नाही; नाराज होऊन अधिवेशनातून परतणाऱ्या आमदारांवर मनसेचा घणाघात)
बुधवारी पुन्हा एकदा पावसाने व्यत्यय आणला आणि खेळ उशिरा सुरू झालं. त्यानंतर बुमराह आणि आकाशदीप सकाळी आणखी ५ षटकं टिकले. आणखी ९ धावांची भर घालून त्यांची ही झुंज संपली. आकाशदीपला ३१ धावांवर ट्रेव्हिस हेडने बाद केलं. ऑस्ट्रेलियाकडे १८५ धावांची आघाडी होती. पण, खरी रंगत निर्माण झाली ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव सुरू झाला तेव्हा. कांगारुंनी पहिल्या चेंडूपासून आक्रमक बाणा ठेवला. जास्तीत जास्त फटकेबाजी करून डाव घोषित करायचा असंच धोरण ठेवलं. (Ind vs Aus, Brisbane Test)
Innings Break!
Australia have declared after posting 89/7 in the 2nd innings.#TeamIndia need 275 runs to win the 3rd Test
Scorecard – https://t.co/dcdiT9NAoa#AUSvIND pic.twitter.com/bBCu6G0pN5
— BCCI (@BCCI) December 18, 2024
त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव वादळी सुरू झाला. पण, बुमराला खेळणं मॅकस्विनी आणि ख्वाजा उस्मानला जमलं नाही. दोघं ४ आणि ८ धावा करून बाद झाले. लबुशेनलाही बुमराने १ धावेवर बाद केलं. ऑस्ट्रेलियाची अवस्था लवकरच ५ बाद ३३ झाली. अर्थात, ऑस्ट्रेलियाला बळींची चिंता नव्हतीच. त्यांना धावा वाढवायच्या होत्या. अखेर ट्रेव्हिस हेड (१७), ॲलेक्स केरी (१९) आणि पॅट कमिन्स (२२) यांनी झटपट धावा करत भारतासमोरचं लक्ष्य अडीचशेच्या पार नेलं. पॅट कमिन्सला बुमराने बाद केल्यावर त्यांनी दुसरा डाव घोषितही केला. (Ind vs Aus, Brisbane Test)
(हेही वाचा- Bangladesh मधील न्यायालयात हल्ला, जीवे मारण्याच्या धमक्या; तरीही संत चिन्मय दास यांचे वकील आहेत ठाम)
भारतासमोर आता विजयासाठी २७५ धावांचं लक्ष्य आहे. कसोटी अनिर्णित राखण्यासाठी किमान ४३ षटकं खेळून काढण्याचं आव्हान आहे. कसोटीच्या पाचव्या दिवशी नवीन चेंडू आणि ढगाळ वातावरणाचा सामना भारतीय फलंदाज कसा करतात यावर सामन्याचं भवितव्य अवलंबून आहे. (Ind vs Aus, Brisbane Test)
हेही पहा-