-
ऋजुता लुकतुके
ब्रिस्बेन कसोटीत (Brisbane Test) तळाच्या फलंदाजांनी केलेल्या प्रतिकारामुळे भारतीय संघाने फॉलो – ऑन टाळला आहे. आकाशदीप (Akash Deep) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) या शेवटच्या जोडीने चौथ्या दिवशी ३९ धावांची नाबाद भागिदारी करत दिवस खेळून काढला. आणि भारतीय डावाला संकटातून बाहेरही काढलं. भारतीय संघ आता १९३ धावांनी पिछाडीवर असला तरी कसोटीचा फक्त एक दिवस बाकी आहे. आणि या वेळेत दोन्ही संघांचे उर्वरित डाव पूर्ण होणं अशक्य असल्यामुळे कसोटी अनिर्णित राहण्याचीच शक्यता जास्त आहे.
भारतीय डाव दुसऱ्या दिवशी ४ बाद २४ अशा अवस्थेत असताना ही कसोटीही गमावण्याचीच टांगती तलवार भारतीय संघावर होती. पण, रोहित शर्मा (Rohit Sharma) १० धावा करून बाद झाल्यानंतर ५ बाद ५५ वरून उर्वरित ५ फलंदाजांनी २०० धावा केल्या आहेत. यात के एल राहुल (८४), रवींद्र जाडेजा (७७), नितिश रेड्डी (१७) आणि त्यानंतर जसप्रीत बुमराह (नाबाद १०) तर आकाशदीप (नाबाद २७) यांचा वाटा निर्णायक ठरला.
(हेही वाचा – Ind vs Aus, Brisbane Test : रोहित, गंभीर यांच्यात समन्वयाचा अभाव आहे का?)
Stumps on Day 4 in Brisbane!
A fighting day with the bat 👏👏#TeamIndia move to 252/9, trail by 193 runs
A gripping Day 5 of Test cricket awaits tomorrow
Scorecard – https://t.co/dcdiT9NAoa#AUSvIND pic.twitter.com/QxCJkN3RR8
— BCCI (@BCCI) December 17, 2024
के एल राहुल ८४ धावांवर बाद झाल्यानंतर जाडेजा आणि नितिश रेड्डी यांनी भारतीय प्रतिकार पुढे सुरू ठेवला. आणि दोघांमध्ये जाडेजाने भारतीय डाव सावरण्याचं मोठं काम केलं. आधीच्या दोन कसोटींत जाडेजाला वगळणं ही कशी चूक होती हेच जाडेजाने आपल्या फलंदाजीने दाखवून दिलं. १२३ चेंडूंत ७७ धावा करताना त्याने १ षटकार आणि ७ चौकार ठोकले. आणि बरोबरच्या तळाच्या फलंदाजाला सांभाळून घेण्याचं कामही चोख केलं.
जाडेजा आणि पाठोपाठ सिराज बाद झाला तेव्हा भारतीय अवस्था ९ बाद २१३ होती. आणि फॉलो ऑन वाचवण्यासाठी संघाला अजून ३२ धावांची गरज होती. पण, बुमराह आणि आकाशदीप यांनी शांत चित्ताने फलंदाजी केली. आणि जम बसल्यावर कमिन्स, स्टार्क आणि लिऑन या कसलेल्या गोलंदाजांच्या चेंडूंवरही धावा जमवल्या. दोघांमध्ये आकाशदीप जास्त अचूक आणि आक्रमक होता. त्याने २७ धावा केल्या आहेत त्या ३१ चेंडूंत. या कसोटीचा आता एक दिवस बाकी आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community