- ऋजुता लुकतुके
ब्रिस्बेन कसोटी अखेर अनिर्णित राहिली आहे. पाचव्या दिवशी चहापानानंतरच्या सत्रात सातत्याने पडलेल्या पावसामुळे दोन्ही संघांनी खेळ बंद करण्याचं मान्य केलं. पण, खरंतर या कसोटीचा हा निकाल चौथ्या दिवशी शेवटच्या सत्रात ठरला होता. भारतीय संघ तेव्हा फॉलो ऑनच्या छायेत होता. तो मिळाला असता तर ऑस्ट्रेलियाला सलग दुसऱ्या डावांत भारतीय फलंदाजांमा गुंडाळून कसोटी जिंकण्याची आशा बाळगता आली असती. पण, ही संधी त्यांच्यापासून हिरावली ती जसप्रीत बुमराह आणि आकाशदीप या अकराव्या जोडीने दोघांनी ९ षटकं खेळून काढत ३९ धावाही जोडल्या आणि कसोटी वाचवण्यात निर्णायक भूमिका बजावली. (Ind vs Aus, Brisbane Test)
त्यानंतर गेले दोन दिवस बुमराहचं ‘माझ्या फलंदाजीविषयी शंका घेणाऱ्यांनी गुगल करा,’ हे अलीकडेच केलेलं वक्तव्य व्हायरल होत आहे. बुमराहच्या या व्हिडिओला आता गुगलचे सध्याचे सीईओ सुंदर पिचाई आणि जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी ट्विटरवर उत्तर दिलं आहे. (Ind vs Aus, Brisbane Test)
(हेही वाचा – Ind vs Aus, Brisbane Test : बुमराहच्या ‘गुगल करा’ उत्तराला गुगलनेही दिला प्रतिसाद)
Nice
— Elon Musk (@elonmusk) December 17, 2024
‘मी गुगल केलं आणि ज्यांनी बुमराहला कमिन्सला हूकचा षटकार खेचताना पाहिलं आहे, ते कधीही त्याच्या फलंदाजीवर शंका घेणार नाहीत,’ असं पिचाई यांनी या संदेशात लिहिलं आहे. विशेष म्हणजे यावर ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनीही एका शब्दात आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘छान,’ असं त्यांनी लिहिलं आहे. पिचाई यांनी हे संभाषण अर्धवट न सोडता, ‘तुम्ही त्याची वाँडरर्स आणि न्यूलँड्समधील गोलंदाजी पाहायला हवी,’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.’ (Ind vs Aus, Brisbane Test)
(हेही वाचा – Ind vs Aus, Brisbane Test : बुमराहच्या फॉलो ऑन वाचवणाऱ्या कामगिरीनंतर मीडियाबरोबरचा संवाद होतोय व्हायरल )
I did Google it:) anyone who can hook Cummins for a six knows how to bat! Well done @Jaspritbumrah93 saving the follow on with Deep!
— Sundar Pichai (@sundarpichai) December 17, 2024
एलॉन मस्क यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेत झाला आहे आणि तिथेच बालपण गेल्यामुळे ते क्रिकेटशी परिचित आहेत. दरम्यान बुमराहविषयी इतकं लिहिलं जाण्याचं कारण म्हणजे ब्रिस्बेन कसोटीतच दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषदेत त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ‘बुमराह, भारतीय फलंदाजीबद्दल बोलण्यासाठी तू योग्य व्यक्ती नाहीस, हे मला ठाऊक आहे. पण, फलंदाजीवर तुझं मत काय आहे?’ असा प्रश्न एका पत्रकाराने विचारल्यावर बुमराहने दिलेलं उत्तर गाजलं होतं. (Ind vs Aus, Brisbane Test)
‘तू माझ्या फलंदाजीवर शंका घेतोयस? गुगल कर आणि बघ एका षटकांत सर्वाधिक धावा कुणी काढल्यात?’ असं उत्तर बुमराहने हसत हसत दिलं होतं. बुमराहने खरंच २०२२ मध्ये लॉर्ड्सवर स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात ३४ धावा कुटल्या होत्या. या उत्तरानंतर ४८ तासांच्या आत बुमराहने आकाशदीपसह ती भागिदारी रचून भारताला फॉलो ऑनपासून वाचवलं. त्यामुळे बुमराहचं पत्रकाराला दिलेलं ते उत्तर सध्या व्हायरल झालं आहे. (Ind vs Aus, Brisbane Test)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community