Ind vs Aus, Brisbane Test : जसप्रीत बुमराह भारताचा ऑस्ट्रेलियातील सगळ्यात यशस्वी गोलंदाज

Ind vs Aus, Brisbane Test : बुमराहने ३ कसोटींत आतापर्यंत २१ बळी मिळवले आहेत. 

50
Ind vs Aus, Brisbane Test : जसप्रीत बुमराह भारताचा ऑस्ट्रेलियातील सगळ्यात यशस्वी गोलंदाज
  • ऋजुता लुकतुके

बोर्डर-गावस्कर मालिकेत भारताचा जसप्रीत बुमराह आतापर्यंत भारताचा सगळ्यात यशस्वी खेळाडू ठरला आहे. ३ कसोटींत मिळून त्याने २ बळी मिळवले आहेत आणि त्याबरोबरच त्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. बुमराह आता ऑस्ट्रेलियातील सगळ्यात यशस्वी भारतीय गोलंदाज ठरला आहे. ब्रिस्बेन कसोटीत दुसऱ्या डावात बुमराहने उस्मान ख्वाजाचा त्रिफळा उडवला आणि हा त्याचा ऑस्ट्रेलियातील ५२ वा बळी ठरला. त्याचबरोबर त्याने कपिल देवचा ५१ बळींचा विक्रम मोडला. (Ind vs Aus, Brisbane Test)

त्यानंतर पुढच्याच षटकांत बुमराहने लबुशेनचाही झटपट काटा काढला आणि ऑस्ट्रेलियन डावाच्या शेवटच्या टप्प्यात जम बसलेल्या पॅट कमिन्सलाही त्यानेच २२ धावांत माघारी पाठवलं. बुमराहने आता ऑस्ट्रेलियातील १० कसोटींमध्ये एकूण ५३ बळी मिळवले आहेत. या मालिकेतील २ कसोटी अजून बाकी आहेत. कपिल देवने ऑस्ट्रेलियात ११ कसोटींमध्ये ५१ बळी मिळवले होते. (Ind vs Aus, Brisbane Test)

(हेही वाचा – Thane Gold theft: ठाण्यातील दागिन्यांच्या दुकानात चोरी; 6.5 किलो सोन्याचे दागिने चोरट्यांनी पळवले)

जसप्रीत बुमराह – ५३*

कपिल देव – ५१

अनिल कुंबळे – ४९

रवी अश्विन – ४०

बिशनसिंग बेदी – ३८

(हेही वाचा – Ind vs Aus, Brisbane Test : बुमराहच्या फॉलो ऑन वाचवणाऱ्या कामगिरीनंतर मीडियाबरोबरचा संवाद होतोय व्हायरल )

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान ऑस्ट्रेलियात झालेल्या कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक बळी मिळवण्याची कामगिरी ऑस्ट्रेलियन फिरकीपटू नॅथन लिऑनने केली आहे. त्याने १८ कसोटींत ६३ बळी मिळवले आहेत. बुमराह या घडीला आयसीसी क्रमवारीतही अव्वल क्रमांकाचा गोलंदाज आहे. या मालिकेत त्याने पहिल्या ३ कसोटींत २१ बळी आतापर्यंत मिळवले आहेत. (Ind vs Aus, Brisbane Test)

दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या देशातील खेळपट्ट्या उसळत्या आणि त्यामुळे फलंदाजांसाठी आव्हानात्मक मानल्या जातात. या देशांना एकत्रपणे सेना देश म्हटलं जातं. या देशांमध्ये त्यांच्याच भूमीत सर्वाधिक बळी घेण्याच्या बाबतीतही बुमरा फक्त अनिल कुंबळेच्या मागे आहे. (Ind vs Aus, Brisbane Test)

(हेही वाचा – Manipur Violence : आतंकवाद्यांकडे स्टारलिंक कंपनीचे इंटरनेट डिव्हाईस; एलन मस्क यांचे कानावर हात)

‘सेना’ देशांविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी करणारे भारतीय,

अनिल कुंबळे – १४१

जसप्रीत बुमराह – १३४*

ईशांत शर्मा – १३०

मोहम्मद शमी – १२३*

झहीर खान – ११९

कपिल देव – ११७

सेना देशांमध्ये एकूण २९ कसोटींमध्ये बुमराहने आतापर्यंत १३३ बळी मिळवले आहेत. यात ऑस्ट्रेलियात सर्वाधिक ५३, इंग्लंड विरुद्ध ३७, द आफ्रिकेविरुद्ध ३८ आणि न्यूझीलंड विरुद्ध २ कसोटींत ६ बळींचा समावेश आहे. (Ind vs Aus, Brisbane Test)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.