-
ऋजुता लुकतुके
ब्रिस्बेन कसोटीत भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांसमोर पुरेसं आव्हान उभं केलं नाही. याला कारण, रोहित शर्माचं नकारात्मक नेतृत्व आहे, अशी गंभीर टीका माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केली आहे. रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर बुमरा आणि नितिश रेड्डी यांनी पहिले ३ बळी ७५ धावांत मिळवले असताना आवश्यक ती आक्रमकता भारतीय कर्णधार दाखवू शकला नाही, असं शास्त्री यांचं म्हणणं आहे. (Ind vs Aus, Brisbane Test)
(हेही वाचा- One Nation One Election विधेयक लोकसभेत स्थगित; राज्यसभेत होणार दोन दिवस विशेष चर्चा)
सुरुवातीच्या पडझडीनंतर ट्रेव्हिस हेड (१५२) आणि स्टिव्ह स्मिथ (१०१) यांनी द्विशतकी भागिदारी करून कसोटी भारतापासून दूर नेली. आणि ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावांत ४४५ अशी मजबूत धावसंख्या उभारली. ‘अत्यंत चुकीची व्यूहरचना,’ असं शास्त्री सामन्याचं समालोचन करताना म्हणाला. (Ind vs Aus, Brisbane Test)
‘हेड आणि स्मिथ यांना कशी गोलंदाजी करायची याची रणनीती गोलंदाजांकडे तयारच नव्हती, असं दिसलं. दोघांना सुरुवातीला आखूड टप्प्याचे चेंडू टाकून हैराण करायला हवं होतं. हेड चांगल्या फॉर्ममध्ये आहे. पण, स्मिथला चांगली गोलंदाजी करून बाद करता आलं असतं. पण, बुमरा सोडला तर एकाही गोलंदाजाने तसा प्रयत्नही केला नाही. रोहितने क्षेत्ररक्षकांची पेरणीही अशी नकारात्मक आणि सावध केली होती की, गोलंदाजांना विश्वास देण्यात तो कमी पडला. या सामन्यात भारताने काही अत्यंत चुकीचे निर्णय घेतले,’ असं रवी शास्त्री म्हणाला. (Ind vs Aus, Brisbane Test)
(हेही वाचा- मी अडीच महिन्यांसाठीही मुख्यमंत्री होऊ शकतो; Ajit Pawar यांच्या मिश्किल उत्तराने पिकला हशा)
समालोचन कक्षात त्याच्या बरोबरी असलेल्या डेव्हिड वॉर्नरनेही हाच मुद्दा उचलून धरला. ‘तुमच्याकडे आघाडी आहे. बुमराने चांगली सुरुवात करून दिली आहे. अशावेळी चेंडू आपलं काम करत होता. भारतीय गोलंदाजांनी फक्त नवीन चेंडूचा फायदा उचलायचा होता. पण, त्यांनी दिशाहीन आणि फलंदाज आरामात खेळून काढेल अशी गोलंदाजी केली,’ असं वॉर्नर म्हणाला. (Ind vs Aus, Brisbane Test)
ब्रिस्बेन कसोटीत पहिल्या डावांत ऑस्ट्रेलियाने ४४५ धावा केल्यानंतर भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली आहे. (Ind vs Aus, Brisbane Test)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community