Ind vs Aus, Brisbane Test : कसोटीत फॉलो ऑनचा नियम नेमकं काय सांगतो?

57
Ind vs Aus, Brisbane Test : ब्रिस्बेन कसोटीत दहाव्या खेळाडूसाठी बुमराह, आकाशदीपची विक्रमी भागिदारी
Ind vs Aus, Brisbane Test : ब्रिस्बेन कसोटीत दहाव्या खेळाडूसाठी बुमराह, आकाशदीपची विक्रमी भागिदारी
  • ऋजुता लुकतुके

ब्रिस्बेन कसोटीचा चौथा दिवस रंगतदार ठरला तो भारताच्या तळाच्या फलंदाजांनी दिलेल्या झुंजीमुळे. सलग दोन दिवस फलंदाजी करण्याचं आव्हान त्यांच्यासमोर होतं. तरंच कसोटी वाचणार होती. त्यासाठी आधी फॉलो ऑन टाळणं महत्त्वाचं होतं. बुमराह आणि आकाशदीप या शेवटच्या जोडीने दीड तास खेळून काढत प्रत्यक्षात फॉलो ऑन टाळला तेव्हा ड्रेसिंग रुममध्ये झालेला जल्लोष सगळ्यांनीच बघितला. फॉलो – ऑन हा नेमका नियम काय आहे? तो कधी लागू होतो. (Ind vs Aus, Brisbane Test)

(हेही वाचा- राज्य सरकारकडून Ratan Tata यांचा सन्मान; कौशल्य विद्यापिठाला नाव देण्याचे विधेयक मंजूर)

दीर्घ पल्ल्याच्या म्हणजे कसोटी क्रिकेटमध्ये, जिथे फलंदाज दोन डावांमध्ये खेळतात, हा नियम लागू होतो. दुसरी फलंदाजी करणाऱ्या संघाला प्रतिस्पर्धी संघाने सलग दोन डाव खेळायला लावणं म्हणजे फॉलो ऑन. हा निर्णय प्रतिस्पर्धी कर्णधार घेत असतो. पण फॉलो ऑन कधीही देता येत नाही. त्यासाठी काही नियम आहेत. मेरिलबोन क्रिकेट क्लबने क्रिकेटचे नियम बनवताना फॉलो ऑन विषयी काय लिहून ठेवलंय ते पाहूया, (Ind vs Aus, Brisbane Test)

‘प्रथम फलंदाजी करणारा संघ अ आणि दुसरी फलंदाजी करणारा संघ ब मानला. तर अ संघाने ब संघाला सर्वबाद करताना २०० धावांपेक्षा जास्त धावांची आघाडी मिळवली, तर अ संघ ब संघाला फॉलो ऑन देऊ शकतो. म्हणजे ब संघाला लगेचच आपला दुसरा डाव खेळावा लागेल. त्यासाठी ही आघाडी २०० पेक्षा जास्त हवी.’ फॉलो ऑन दिला तर अ संघाचा दुसरा डाव पुढे ढकलण्यात येतो. म्हणजे गरज पडल्यास ते चौथा डाव खेळायला येतात.  (Ind vs Aus, Brisbane Test)

(हेही वाचा- Car VIP Number : दुचाकीतील आकर्षक क्रमांक चारचाकींसाठी राखून ठेवण्यासाठी ‘हे’ करा)

म्हणजेच अ संघाने ५०० धावा केल्या. आणि ब संघ ३०० धावांच्या आत सर्वबाद झाला तर अ संघ ब संघावर फॉलो ऑन लादू शकतो. अगदी ब संघाने ३०० धावा केल्या असतानाही फॉलो ऑन लादता येतो. कसोटी अनिर्णित राहण्यापासून वाचावी आणि निकाल लागावा यासाठी हा नियम तयार करण्यात आला होता. तसंच यातून एका संघाचं कसोटीवरील पूर्ण वर्चस्व अधोरेखित होतं. (Ind vs Aus, Brisbane Test)

ब संघाचा पहिला डाव संपल्यावर अ संघाच्या कर्णधाराने ब संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये जाऊन त्यांना हा निर्णय कळवायचा असतो. तसंच पंच आणि सामनाधिकाऱ्यांनाही हा निर्णय सांगायचा असतो. महत्त्वाचं म्हणजे २०० धावांचं हे अंतर ५ दिवस चालणाऱ्या कसोटीसाठी आहे.  (Ind vs Aus, Brisbane Test)

३ ते ४ दिवसांची कसोटी असेल तर १५० धावांची आघाडी आवश्यक आहे.

२ दिवसांची कसोटी असेल तर १०० धावांची आघाडी आवश्यक आहे.

१ दिवसाची कसोटी असेल तर ७५ धावांची आघाडी आवश्यक आहे.

(हेही वाचा- Oath ceremony: मंत्री होण्यासाठी मतदान केलेले नाही; नाराज होऊन अधिवेशनातून परतणाऱ्या आमदारांवर मनसेचा घणाघात)

ब्रिस्बेन कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४४५ धावा केल्यामुळे फॉलो ऑन टाळण्यासाठी भारताला २४६ धावांची गरज होती. जाडेजा बाद झाल्यावरही आणखी ३३ धावा संघाला हव्या होत्या. पण, बुमराह आणि आकाशदीप यांनी तो दिवसही खेळून काढला. आणि कसोटी वाचवण्याच्या दृष्टीने ठोस पाऊल टाकलं.  (Ind vs Aus, Brisbane Test)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.