Ind vs Aus, Brisbane Test : ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवण्यासाठी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल यांचा मंत्र काय आहे?

Ind vs Aus, Brisbane Test : खासकरून भारतीय गोलंदाज ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर दबाव निर्माण करू शकले नाहीत

67
Ind vs Aus, Brisbane Test : ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवण्यासाठी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल यांचा मंत्र काय आहे?
Ind vs Aus, Brisbane Test : ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवण्यासाठी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल यांचा मंत्र काय आहे?
  • ऋजुता लुकतुके

ब्रिस्बेन कसोटीत भारतीय संघाची सुरुवात खराब झाली आहे. नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी घेण्याचा धाडसी निर्णय रोहित शर्माने घेतला. पण, तो संघाच्या अंगलट आला. कारण, ऑस्ट्रेलियाने खराब होत जाणाऱ्या या खेळपट्टीवर ४४५ धावा केल्या. त्यानंतर भारताची सुरुवात मात्र खराब झाली आहे. भारतीय गोलंदाज दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर दबाव निर्माण करण्यात अपयशी ठरले. यावर भारतीय संघाचे गोलंदाजीचे प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल यांनी भाष्य केलं आहे. ऑस्ट्रेलियात विजयासाठी काय केलं पाहिजे याचे धडेही भारतीय संधासाठी दिले आहेत. (Ind vs Aus, Brisbane Test)

(हेही वाचा- Ind vs Aus, Brisbane Test : रोहित शर्माच्या नकारात्मक नेतृत्वावर रवी शास्त्री यांची टीका)

सगळ्यात आधी नियोजनबद्ध गोलंदाजी भारतीय संघाला करता आली नाही, ही चूक त्यांनी मान्य केली. ‘कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रांत आम्ही चांगली गोलंदाजी केली. पण, दुसरं अख्खं सत्र हेड आणि स्मिथ यांनी खेळून काढलं. त्यांचा जम बसल्यावर तिसऱ्या सत्रात दोघांनी ३१ षटकांतच १७१ धावा कुटून काढल्या. दोधांना जुन्या चेंडूवर कशी गोलंदाजी करायची हे ठरलेलं होतं. पण, प्रत्यक्ष मैदानात ते दिसून आलं नाही,’ असं मॉर्नी मॉर्केल याविषयी बोलताना म्हणाले. (Ind vs Aus, Brisbane Test)

‘हेड ॲडलेडमध्ये ज्या पद्धतीने खेळला, ते पाहता त्याला पूर्ण टप्प्याने गोलंदाजी करायची आणि दिशा सरळ यष्ट्यांच्या टप्प्यात ठेवायची, असं आम्ही ठरवलं होतं. पण, मैदानात काही वेळा आम्हाला ते जमलं नाही. लय बिघडलेली असताना गोलंदाजांनी धावाही लुटल्या. जम बसलेल्या फलंदाजांना बाद करण्याचा एक मार्ग म्हणजे त्यांच्या धावांचा वेग कमी करणं. पण, ते गोलंदाजांना जमलं नाही. त्यामुळे कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाज रणनीती मैदानात उतरवण्यात कमी पडले,’ असं मॉर्नी मॉर्केल यांनी बोलून दाखवलं. (Ind vs Aus, Brisbane Test)

(हेही वाचा- Maharashtra Cabinet : राज्यातील ‘हे’ १७ जिल्हे मंत्रीपदापासून वंचित! वाचा संपूर्ण यादी एका क्लिकवर)

ऑस्ट्रेलियात यशस्वी व्हायचं असेल तर गोलंदाजांना चेंडूचा टप्पा नीट सापडायला हवा, असं मॉर्केल यांनी आवर्जून बोलून दाखवलं. (Ind vs Aus, Brisbane Test)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.