ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (IND vs AUS) पहिल्या वन डे सामन्यात मोहम्मद शमीची अप्रतिम गोलंदाजी आणि शुबमन गिल तसेच ऋतुराज गायकवाड या नव्या सलामीवीरांनी १४२ धावांची भागीदारी करून भारताचा विजय निश्चित केला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय फलंदाज त्यांना पुरून उरले. भारताने हा सामना जिंकून ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. त्यामुळे आज म्हणजेच रविवार २४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी ‘करो या मरो’ची परिस्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे भारताला आजचाही सामना जिंकून ही तीन सामन्यांची मालिका जहज खिशात घालण्याची संधी आहे.
आज इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये (IND vs AUS) हा सामना खेळला जाणार आहे. या सामन्याला दुपारी दीड वाजता सुरुवात होणार आहे. भारताच्या कर्णधारपदाची धुरा केएल राहुल याच्या खांदयावर आहे तर पॅट कमिन्स याच्याकडे ऑस्ट्रेलियाची सूत्रं आहेत. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला याच वर्षी मार्च महिन्यात ३ सामन्यांच्या मालिकेत २-१ अशा फरकाने पराभूत केलं होतं. त्यामुळे टीम इंडियाला आता दुसरा सामना जिंकून ही मालिका पराभवाची परतफेड करण्याची सुवर्णसंधी आहे.
(हेही वाचा – Monsoon Update : पुढील दोन – तीन दिवसांत कोकणसह विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता)
भारतात होणाऱ्या विश्वचषकापूर्वी होणारी ही भारत ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) सिरीज फार महत्वाची मानली जात आहे. त्यामुळे आजचा सामना नक्की कोण जिंकणार आणि विश्वचषक खेळण्यासाठी कोण किती सज्ज आहे ते या मालिकेमधून पाहायला मिळणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात आतापर्यंत ६८ वन-डे सामने खेळले गेले. त्यापैकी भारताने ३१ तर ऑस्ट्रेलियाने ३२ सामने जिंकले तर ५ सामने अनिर्णित राहिले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community