ऋजुता लुकतुके
या विश्वचषकात अपराजित असलेला भारतीय संघ आता अंतिम सामन्यासाठी अहमदाबादमध्ये दाखल झाला आहे. विमानतळ आणि हॉटेलमध्येही भारतीय संघाचं चाहत्यांनी जोरदार स्वागत केलं.
आधीच भारतात दिवाळीचं वातावरण आहे. आणि त्यात भारतीय क्रिकेट संघ (Ind vs Aus Final) एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत विजयरथावर आरूढ झाला आहे. त्यामुळे संघाचा प्रत्येक विजय हा चाहत्यांकडून जल्लोषात साजरा होत आहे. अशातच भारतीय संघ गुरुवारी (१६ नोव्हेंबर) दुपारी अंतिम सामन्यासाठी अहमदाबादमध्ये दाखल झाला आहे. आणि चाहत्यांनी संघाचं जोरदार स्वागत केलं.
भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind vs Aus Final) या संघांदरम्यान आता विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणार आहे.
Team India has arrived in Ahmedabad to win the World Cup 2023 💙
Crazy welcome outside Team Hotel.#CWC23 #TeamIndia #SAvAUS pic.twitter.com/eQRsrUXjtK
— Ishan Joshi (@ishanjoshii) November 16, 2023
(हेही वाचा – Rahul Dravid : विश्वचषकानंतर भारतीय संघाचा प्रशिक्षक बदलणार?)
अहमदाबाद विमानतळावरून (Ind vs Aus Final) भारतीय संघ हॉटेलला रवाना झाला तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा लोक जमले होते. आणि ते संघाच्या बाजूने घोषणाही देत होते. आपल्या लाडक्या खेळाडूची छबी पाहण्यासाठी सगळे उत्सुक होते. संघाचा विमानतळ ते हॉटेल हा प्रवास मिरवणूकीपेक्षा कमी नव्हता.
आणि हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनीही भारतीय संघाचं जोरदार स्वागत केलं.
(हेही वाचा – India in Final : उपांत्य फेरीतील विजयानंतर भारतीय ड्रेसिंगरुममध्ये असा झाला जल्लोष)
#WATCH | Indian cricket team arrived in Ahmedabad, Gujarat
The final match of #ICCWorldCup2023 will be played in Ahmedabad on Sunday, November 19. pic.twitter.com/BbTEtorVnQ
— ANI (@ANI) November 16, 2023
भारतीय खेळाडूंचं औक्षण करण्यात आलं. आणि हार घालून त्याचं हॉटेलमध्ये स्वागत झालं. हॉटेलच्या बाहेरही संघाचे चाहते रात्री उशिरापर्यंत उभे होते.
भारतीय संघ (Ind vs Aus Final) या स्पर्धेत भन्नाट फॉर्ममध्ये आहे. आतापर्यंत साखळी स्पर्धेतील ९ आणि उपान्त्य फेरीतील न्यूझीलंड विरुद्धचा विजय असे सलग १० विजय मिळवून भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. स्पर्धेत विराट कोहली ७९१ धावा करून सगळ्यात यशस्वी फलंदाज ठरलाय. तर महम्मद शामी २४ बळींसह यशस्वी गोलंदाज आहे. शिवाय भारताचे रोहीत शर्मा, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर हे फलंदाजही चांगलेच फॉर्मात आहेत. आणि शामीसह बुमरा आणि महम्मद सिराज हे तेज त्रिकुट भेदक गोलंदाजीने भारताला विजय मिळवून देतंय. (Ind vs Aus Final)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community