IND vs AUS : भारताचे ऑस्ट्रेलियाला 175 धावांचे लक्ष्य; रिंकू-जितेशची जोरदार फलंदाजी

IND vs AUS : मालिकेतील चौथ्या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया रायपूरच्या मैदानावर समोरासमोर

344
IND vs AUS : भारताचे ऑस्ट्रेलियाला 175 धावांचे लक्ष्य; रिंकू-जितेशची जोरदार फलंदाजी
IND vs AUS : भारताचे ऑस्ट्रेलियाला 175 धावांचे लक्ष्य; रिंकू-जितेशची जोरदार फलंदाजी

भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील चौथा टी-20 सामना (T20 Match) रायपूर (Raipur) येथे खेळवला जात आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी (Batting) करण्याचा निर्णय घेतला. भारत या मालिकेत आधीच 2-1 ने आघाडीवर आहे. अंतिम सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाकडून 5 गडी राखून पराभव झाला. जितेश शर्मा उत्तम फॉर्ममध्ये दिसत होता; परंतु मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. त्याने 19 चेंडूंत 35 धावा केल्या. (IND vs AUS)

(हेही वाचा – MLA Disqualification Case : अनिल देसाई यांनी पाठवलेले पत्र रेकॉर्डवर आणा; ठाकरे गटाचे विधानसभा अध्यक्षांना पत्र)

ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 175 धावांची गरज

ऑस्ट्रेलियाच्या 175 धावांच्या प्रत्युत्तरात भारताने प्रथम फलंदाजी करतांना 174 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 175 धावांची गरज आहे. भारताकडून रिंकू सिंगने सर्वाधिक 46 धावा केल्या. जितेश शर्माने 35, जयस्वालने 37 आणि गायकवाडने 32 धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यात भारताने प्लेइंग इलेव्हनमध्ये चार बदल केले आहेत. प्रसिद्ध कृष्णाच्या जागी मुकेश कुमार, अर्शदीप सिंगच्या जागी दीपक चहर, तिलक वर्माच्या जागी श्रेयस अय्यर आणि ईशान किशनच्या जागी जितेश शर्मा यांची निवड करण्यात आली आहे. (IND vs AUS)

(हेही वाचा – Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंचे महापालिका आयुक्तांना पुन्हा पत्र, म्हणाले…)

हे आहेत प्लेइंग इलेव्हन

भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, जितेश शर्मा, रिंकू सिंग, मुकेश कुमार, दीपक चहर, आवेश खान, अक्षर पटेल आणि रवी बिश्नोई.

ऑस्ट्रेलिया : जोश फिलिप, ट्रॅव्हिस हेड, बेन मॅकडरमॉट, आरोन हार्डी, टिम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, मॅथ्यू वेड (विकेटकीपर/कप्तान), बेन द्वारशुइस, ख्रिस ग्रीन, जेसन बेहरेनडॉर्फ, तनवीर संघा. (IND vs AUS)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.