भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ९९ धावांच्या (IND Vs AUS) मोठ्या फरकाने एकतर्फी पराभव केला आणि २-० ने मालिकाही जिंकली आहे. अशातच भारतीय संघाला अजून एक आनंदाची बातमी मिळाली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर भारतीय (IND Vs AUS) संघ हा आयसीसीच्या वनडे क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. विशेष म्हणजे भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना जिंकला नाही तरीही आयसीसीच्या क्रमवारीत तिळमात्रही फरक पडणार नाही. त्यामुळे आता विश्वचषक सुरु होण्याआधीच टीम इंडिया आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचली आहे.
(हेही वाचा – R Ashwin : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत अश्विनने मोडला अनिल कुंबळेचा ‘हा’ विक्रम)
भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धचा दुसरा सामना (IND Vs AUS) गमावला असता तर पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांना आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानावर जाण्याची संधी होती. मात्र भारताच्या विजयामुळे पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाचे अव्वल स्थानाचे स्वप्न भंगले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया आता विश्वचषकापूर्वी कोणतीही दुसरी मालिका खेळणार नसल्याने त्यांना आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचण्याची संधी मिळणार नाही आहे.
त्यामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या (IND Vs AUS) या विजयानंतर भारतीय संघासाठी आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचणे ही फार मोठी आनंदाची बाब असल्याचे म्हंटले जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community