IND Vs AUS : भारताचे ऑस्ट्रेलियासमोर 399 धावांचे आव्हान 

142
IND Vs AUS : भारताचे ऑस्ट्रेलियासमोर 399 धावांचे आव्हान 
IND Vs AUS : भारताचे ऑस्ट्रेलियासमोर 399 धावांचे आव्हान 

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. (IND Vs AUS) ऑस्ट्रेलियाविरोधात इंदौर वनडे सामन्यात श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल यांनी शानदार शतक ठोकले. विश्वचषकापूर्वी श्रेयस अय्यरने वादळी फलंदाजी करत शतकाला गवसणी घातली. निर्धारित ५० षटकांत भारताने ५ बाद ३९९ धावांचा डोंगर उभारला. श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल यांनी वादळी शतके ठोकली, तर केएल राहुलने कर्णधाराला साजेशी फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ४०० धावांचे आव्हान देण्यात आले आहे. (IND Vs AUS)

(हेही वाचा – Virar : पत्ते खेळत असतांना पोलीस आले म्हणून पळाला अन् मृत्यूने गाठले)

श्रेयस अय्यरने  86 चेंडूत शतक ठोकले. श्रेयस अय्यरचे हे वनडे कारकिर्दीतील तिसरे शतक आहे. कांगारुंच्या गोलंदाजाविरोधात गिलची बॅट तळपली. गिलने ९२ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. या शतकी खेळीत त्याने 6 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश आहे.

ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. 16 धावांच्या स्कोअरवर सलामीवीर ऋतुराज गायकवाड 12 चेंडूत 8 धावा करून बाद झाला. यानंतर शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी चांगली खेळी केली. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर भारताच्या सर्व  फलंदाजांनी सहज धावा केल्या. (IND Vs AUS)

हा सामना जिंकून भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 वनडे मालिका जिंकणार आहे. सध्या टीम इंडिया 1-0 ने आघाडीवर आहे. या सामन्यातील विजयासह भारतीय संघ 5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत जगातील नंबर 1 संघ म्हणून उदयास येईल याचीही खात्री करेल. भारत सध्या नंबर-1 वर आहे. विश्वचषकात नंबर-1 म्हणून प्रवेश करण्यासाठी संघाला मालिकेतील दोन सामने जिंकणे आवश्यक आहे. (IND Vs AUS)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.