भारत-ऑस्ट्रेलिया मध्ये विश्वचषकाचा अंतिम सामना चालू आहे. (Ind vs Aus) संपूर्ण भारतियांचे लक्ष लागलेल्या या सामन्याच्या सुरक्षेत मोठी चूक झाली आहे. सामना चालू असतांना मैदानात थेट पॅलेस्टाईन समर्थकाने एन्ट्री केली. त्याने थेट विराट कोहलीची भेट घेतली. त्याला मिठी मारली. सुरक्षारक्षकाने येऊन त्या व्यक्तीला बाहेर काढले. पॅलेस्टाईनवर होत असेलेला हल्ले थांबवा, अशा आशयाचा टी शर्ट या तरुणाने घातला होता. तिने मास्कही घातला होता.
(हेही वाचा – Anjali Damania यांच्या आरोपावर समीर भुजबळ यांचा खुलासा; म्हणाले, हा बदनामीचा कट)
भारतीय संघाने या सामन्याची सुरुवात चांगली केली. ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीमुळे भारताच्या पहिल्या तीन विकेट्स झटपट गेल्या. रोहित शर्मा आणि शुभमन गिल हे पहिल्या 10 ओव्हरआधीच तंबूत परतले. तर श्रेयस अय्यरची विकेट देखील लवकर गेली. त्यामुळे किंग विराट कोहली आणि उपकर्णधार केएल राहुल यांनी डाव सावरला. त्यावेळी मैदानात एका पॅलेस्टाईन समर्थकाने (Palestinian supporter) थेट मैदानात येऊन विराटची भेट घेतली.
(हेही वाचा – दिल्ली पालिकेच्या बगीचावर Jama Masjid चे अतिक्रमण; काय म्हणते Delhi High Court)
गुजरात पोलिसांच्या गुन्हे शाखेने पॅलेस्टिनी समर्थकाला अटक केली आहे. त्याने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये प्रवेश करण्यासाठी सुरक्षा भंग केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (Ind vs Aus)
इस्रायल-हमास युद्धानंतर पॅलेस्टाईन आणि हमासच्या समर्थनार्थ अनेक ठिकाणी रॅली काढल्या जात आहेत. मात्र स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित असताना पॅलेस्टाईन समर्थकाने मैदानात येऊन विराट कोहलीची भेट घेणे ही मोठी चूक आहे.
हेही पहा –