- ऋजुता लुकतुके
भारतीय संघाने पर्थ कसोटीच्या ३ दिवसांवर वर्चस्व गाजवत २९५ धावांनी दमदार विजय मिळवला. विजयासाठी ५३४ धावांचं आव्हान समोर असताना जागतिक क्रमवारीत अव्वल असलेला कसोटी संघ २३८ धावांतच बाद झाला. या विजयामुळे भारतीय संघाने मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. शिवाय भारताचा ऑस्ट्रेलियातील हा धावांच्या निकषावर सगळ्यात मोठा विजय आहे. शिवाय न्यूझीलंड विरुद्ध मायदेशात झालेल्या पराभवाचं शल्यही थोडंफार पुसलं गेलं आहे. (Ind vs Aus, Perth Test)
यापूर्वी १९७७ मध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध मेलबर्नमध्ये २२२ धावांनी विजय मिळवला होता. हा विक्रम आता भारतीय संघाने मागे टाकला आहे. पर्थची खेळपट्टी ऑस्ट्रेलियातील सगळ्यात उसळती आणि अनियमित उसळी असलेली मानली जाते. अशा खेळपट्टीवर भारताने हा विजय साध्य केला आहे. २००८ मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने इथं एकमेव विजय मिळवला होता. त्यानंतर जसप्रीत बुमराहने ही किमया केली आहे. या कसोटीत भारतीयांनी केलेले काही विक्रम बघूया, (Ind vs Aus, Perth Test)
(हेही वाचा – Special Editorial : उतू नका, मातू नका… हिंदुत्वाचा वसा सोडू नका!)
भारत वि. ऑस्ट्रेलिया कसोटीत भारताचे मोठे विजय
३२० धावा – मोहाली २००८
२९५ धावा – पर्थ २०२४
२२२ धावा – मेलबर्न १९७७
१७९ धावा – चेन्नई १९९८
१७२ धावा – नागपूर २००८
भारतीय संघाचे आशिया बाहेर परदेशात मिळवलेले मोठे विजय
३१८ धावा – वि. वेस्ट इंडिज (नॉर्थ साऊंड, २०१८)
२९५ धावा – वि. ऑस्ट्रेलिया (पर्थ, २०२४)
२७९ धावा – वि. इंग्लंड (हेडिंग्ले, १९८६)
२७२ धावा – वि. न्यूझीलंड (ऑकलंड १९६८)
२५७ धावा – वि. वेस्ट इंडिज (किंग्जटन २०१९)
(हेही वाचा – अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी PM Narendra Modi यांनी विरोधकांना सुनावलं)
जसप्रीत बुमराहने या कसोटीत ७२ घावा देत ८ बळी मिळवले. कर्णधार असताना परदेशात भारतीय खेळाडूने केलेली ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी बिशनसिंग बेदी यांनी ऑस्ट्रेलियातच कसोटीत १० बळी मिळवले होते. एकूणच भारतीय कर्णधारांनी कसोटीत केलेली सर्वोत्तम कामगिरी पाहूया, (Ind vs Aus, Perth Test)
१०/१३५ – कपिल देव वि. वेस्ट इंडिज (अहमदाबाद, १९८३)
१०/१९४ – बिशनसिंग बेदी वि. ऑस्ट्रेलिया (पर्थ, १९७७)
९/७० – बिशन सिंग बेदी वि. न्यूझीलंड (चेन्नई, १९७६)
८/७२ – जसप्रीत बुमरा वि. ऑस्ट्रेलिया (पर्थ, २०२४)
८/१०९ – कपिल देव वि. ऑस्ट्रेलिया (ॲडलेड १९८५)
जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियात ४० बळी पूर्ण केले आहेत आणि त्यासाठी त्याची सरासरी आहे १८.८० धावांची. ऑस्ट्रेलियात किमान ३० बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये बुमराहची सरासरी फक्त रिचर्ड हॅडली (१७.८३) यांच्यापेक्षा कमी आहे. बाकी अगदी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांमध्येही बुमराह अव्वल आहे.
(हेही वाचा – Maharashtra Election Results 2024 : मुंबईत ३२ पैकी २५ विद्यमान आमदार पुन्हा विजयी;, मात्र कुणाचे मताधिक्य घटले?)
जसप्रीत बुमराहची ऑस्ट्रेलियातील कामगिरी
कसोटी – ८
बळी – ४०
सरासरी – १८.८
स्ट्राईक रेट – ४५.७
डावांत ५ बळी – २
मागच्या २० वर्षांत फक्त चौथ्यांदा पाहुण्या संघाला ऑस्ट्रेलियात मालिकेची सुरुवात विजयाने करता आली आहे. भारताव्यतिरिक्त एकट्या आफ्रिकन संघाने ही किमया यापूर्वी दोनदा केली आहे. (Ind vs Aus, Perth Test)
ऑस्ट्रेलियन संघाने मालिकेत पहिली कसोटी हरल्याची नोंद
वि. द आफ्रिका – पर्थ २००८
वि. द आफ्रिका – पर्थ २०१६
वि. भारत – ॲडलेड २०१८
वि. भारत – पर्थ २०२४
हेही पहा –
Join Our WhatsApp Community