Ind vs Aus, Perth Test : पर्थ कसोटीची खेळपट्टी नक्की कशी असेल? क्युरेटर काय म्हणतात?

Ind vs Aus, Perth Test : पर्थमध्ये झालेल्या अनियमित पावसामुळे खेळपट्टी रोज रुप बदलत आहे.

64
Perth Test, 2nd Day : पर्थ कसोटीच्या दुसऱ्या दिवशी बुमराह, जयस्वाल आणि राहुलचा जलवा
  • ऋजुता लुकतुके

क्रिकेट विश्वात आता सगळ्यांचं लक्ष असेल ते बोर्डर-गावस्कर चषकातील पहिला कसोटी सामन्याचं ठिकाण असलेल्या पर्थकडे. २२ नोव्हेंबरला म्हणजे शुक्रवारी ही कसोटी सुरू होत आहे आणि उत्सुकता आहे ती कसोटीसाठीच्या खेळपट्टीची. पर्थमध्ये शुक्रवारी पावसाच्या व्यत्ययाची शक्यता खूपच कमी आहे. पण, मागचे काही दिवस इथं अनियमित पाऊस झाला आहे आणि त्याचा खेळपट्टीवरही परिणाम झाल्याचं खुद्द इथले क्युरेटर आयझॅक मॅकडोनाल्ड यांनी सांगितलं आहे. (Ind vs Aus, Perth Test)

‘आम्ही खेळपट्टीवर गवत ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. त्यामुळे ही खेळपट्टी आपला पारंपरिकदृष्ट्या जशी असते तशीच असेल. अनियमित उसळी इथे चेंडूला मिळू शकते. पण, दोन दिवस ऊन पडलेलं नाही. त्यामुळे नेहमीपेक्षा भेगा कमी असतील,’ असं मॅकडोनाल्ड यांनी फॉक्स वाहिनीशी बोलताना सांगितलं. पर्थमधील खेळपट्टीवर भेगांची रांगच रांग एरवी दिसते आणि गंमतीने ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये त्याला ‘ओप्टस साप’ असं म्हटलं जातं. पण, यंदा असे साप म्हणजेच खेळपट्टीवरील भेगा कमी दिसतील असं मॅकडोनाल्ड यांना म्हणायचं आहे. (Ind vs Aus, Perth Test)

(हेही वाचा – Vasai-Virar महापालिका क्षेत्रात उपलब्ध पाणीसाठा जास्त असूनही पाणीटंचाई का?; आरटीआयच्या माहितीमुळे निर्माण होतोय प्रश्न)

पर्थमधील हे नवीन क्रिकेट स्टेडिअम आहे आणि २०१८ मध्ये त्याचं उद्घाटन झालं होतं. उद्घाटनाच्या सामन्यात विराट कोहलीने भारतासाठी शतक झळकावलं होतं. पण, भारताने ती कसोटी गमावली होती. तेज गोलंदाजांना साथ देणारं मैदान अशीच या ऑप्टस मैदानाचीही ओळख आहे. भारतीय संघ या मैदानापासून जवळ असलेल्या वाका मैदानावर सध्या सराव करत आहे. (Ind vs Aus, Perth Test)

‘ऑप्टसवर नेहमीच आम्ही ८ ते १० मिलीमीटर इतकं गवत ठेवलं आहे. आताही तेच करणार आहोत. गुरुवारच्या दिवशीपर्यंत दर तासाला आम्ही खेळपट्टीचं परीक्षण करत आहोत. निदान सकाळच्या सत्रात इथं चेंडूला चांगली उसळी मिळेल आणि चेंडू फलंदाजांच्या कानाजवळून वेगात जातील एवढं नक्की,’ असं मॅकडोनाल्ड यांनी हसत हसत सांगितलं. शुक्रवारी भारतीय वेळेनुसार सकाळी ५.५० मिनिटांनी कसोटी सामना सुरू होणार आहे. (Ind vs Aus, Perth Test)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.