-
ऋजुता लुकतुके
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान पर्थ कसोटीची नाणेफेक झाली आणि बदली कर्णधार जसप्रीत बुमराने नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी घेतली. पुढे कसोटीसाठी अंतिम अकरा जणांच्या संघाबद्दल बोलताना बुमरा म्हणाला, ‘तिघे संघात पदार्पण करत आहेत. वॉशी हा एकमेव फिरकीपटू संघात आहे.’ याचा दुसरा अर्थ असा होता की, रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन या अनुभवी फिरकीपटूंना भारतीय संघाने वगळलं होतं. हर्षित राणा आणि नितिश कुमार रेड्डी या दोन तरुण खेळाडूंना पदार्पणाची संधी मिळाली. पण, त्यांचाही विचार जडेजा आणि अश्विनच्या वर झाला. भारतीय संघाची नेमकी रणनीती काय होती? (Ind vs Aus, Perth Test)
(हेही वाचा- Bitcoin Scams मधील आवाज एआयचा नाही; रवींद्र पाटील यांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा)
जसप्रीतने फिरकीपटू असा वॉशिंग्टनचा उल्लेख केला आहे. त्यामुळे त्याच्याकडे गोलंदाजीसाठी पाहिलं जात आहे हे उघड आहे. आणि न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत त्याने केलेली कामगिरी त्याला संघात स्थान मिळवून गेली आहे हे ही स्वाभाविक आहे. जडेजा आणि अश्विन यांनी त्यांच्याकडून अपेक्षा असताना मायदेशात चांगली कामगिरी केली नाही. उलट सुंदर सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याच्या जोरावर गौतम गंभीर आणि संघ प्रशासनाने हा धाडसी निर्णय घेतला आहे. (Ind vs Aus, Perth Test)
Very brave call to pick Washington Sundar over Ashwin, who is very highly rated here. Hugely encouraging for him and wish him well.
and huge encouragement,
— Harsha Bhogle (@bhogleharsha) November 22, 2024
महत्त्वाचं म्हणजे सुंदरची ऑस्ट्रेलिया विरुद्धची ही दुसरी मालिका आहे. आधीच्या मालिकेत तो बॅटनेही चमकला होता. ऑस्ट्रेलियातील आव्हानात्मक खेळपट्टीवर सुंदरने ४८ ची सरासरी राखली होती. खेळलेल्या २ कसोटींत २०० धावा केल्या होत्या. त्याची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या होती ६२ ची. या कामगिरीचा विचारही झाला असणार आहे. गोलंदाजीतही त्याने ७९ धावांत ३ बळी मिळवले होते. (Ind vs Aus, Perth Test)
🚨 Toss & Team News from Perth 🚨
Jasprit Bumrah has won the toss & #TeamIndia have elected to bat in the first Test.
Nitish Kumar Reddy & Harshit Rana make their Test debuts 🧢🧢 for India.
A look at our Playing XI 🔽
Live ▶️ https://t.co/gTqS3UPruo#AUSvIND |… pic.twitter.com/HVAgGAn8OZ
— BCCI (@BCCI) November 22, 2024
न्यूझीलंड विरुद्धच्या मायदेशातील मालिकेत तर वॉशिंग्टन सुंदरच भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज होता. २० च्या सरासरीने त्याने २३ बळी मिळवले. शिवाय फलंदाजीतही तो खळपट्टीवर उभा राहण्याची हुकुमत दाखवत होता. सातत्याने बळी मिळवण्याचं कसब त्याला साधलं आहे. त्या बाबतीत सध्या भारतीय गोलंदाजांमध्ये तो उजवा आहे. (Ind vs Aus, Perth Test)
(हेही वाचा- राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्रातच ठरणार दिल्लीत नाही – Sanjay Raut)
दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे तो ऑफस्पिन गोलंदाजी करतो. आणि ऑस्ट्रेलियाकडे उस्मान ख्वाजा, ट्रेव्हिस हेड, ॲलेक्स कॅरी, जोस हेझलवूड आणि मिचेल स्टार्क असे तब्बल ६ डावखुरे फलंदाज आहेत. डावखुऱ्या फलंदाजांसाठी ऑफस्पिन गोलंदाजी आव्हानात्मक असतं. हे आणखी एक कारण सुंदरच्या निवडीमागे असू शकतं. (Ind vs Aus, Perth Test)
India have won the toss and chosen to bat first against Australia#AUSvIND
— cricket.com.au (@cricketcomau) November 22, 2024
पर्थची खेळपट्टी पारंपरिक दृष्ट्या तेज गोलंदाजांना सहाय्य करते. पण, तिसऱ्या दिवसापासून इथं खेळपट्टीला भेगा पडायला लागतात. आणि अशावेळी फिरकीही प्रभावी ठरू शकते. तो अंदाज घेऊनच भारतीय संघ प्रशासनाने ही तांत्रिक निवड केलेली दिसत आहे. सध्या पहिल्या डावांत वॉशिंग्टन सुंदर ४ धावा करून बाद झाला आहे. (Ind vs Aus, Perth Test)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community