Ind vs Aus, T-20, ODI Series : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान ऑक्टोबर – नोव्हेंबरमध्ये रंगणार ८ टी-२०; एकदिवसीय सामने

Ind vs Aus, T-20, ODI Series : या दौऱ्याचा कार्यक्रम क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केला आहे.

67
Ind vs Aus, T-20, ODI Series : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान ऑक्टोबर - नोव्हेंबरमध्ये रंगणार ८ टी-२०; एकदिवसीय सामने
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघ यंदा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात ३ एकदिवसीय आणि ५ टी-२० सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. या दौऱ्यासाठीचा कार्यक्रम क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आता जाहीर केला आहे. भारतीय संघ या दौऱ्यात आठ शहरांना भेट देणार आहे. ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच आठही राज्यांमध्ये एकाच हंगामात सामने होणार आहेत. भारताचे टी-२० सामने होबार्ट आणि कॅनबेरा इथं होणार आहेत. (Ind vs Aus, T-20, ODI Series)

ऑस्ट्रेलियात एका हंगामात आधी ठरवलेल्या ठिकाणीच सामने खेळवण्याची पद्धत आहे. ती मैदानं मग त्या प्रकारच्या क्रिकेटसाठी तयार केली जातात. म्हणजे सध्या ॲडलेड, पर्थ, मेलबर्न, सिडनी आणि ब्रिस्बेन ही पाच कसोटीची केंद्र आहेत. तर हंगामातील सर्व कसोटी सामने या पाच मैदानांवरच खेळवले जातात. त्यामुळे इथे खेळपट्टी तयार करणं आणि तिचा दर्जा टिकवणं सोपं जातं असं काहींचं म्हणणं आहे. इंग्लंडमध्येही हीच पद्धत वापरली जाते. हंगामाच्या सुरुवातीला कसोटी केंद्र जाहीर केली जातात. तसंच कसोटींसाठी वापरलेली किंवा वापरण्यात येणारी खेळपट्टी टी-२० ला वापरली जात नाही, असाही एक प्रघात आहे. (Ind vs Aus, T-20, ODI Series)

(हेही वाचा – भारताला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करा; Swami Bharatananda Saraswati यांची मागणी)

भारतीय संघाने नुकताच डिसेंबर २०२४ ते जानेवारी २०२५ दरम्यान ऑस्ट्रेलियाचा कसोटी दौरा केला होता. यात भारताला १-३ असा लाजिरवाणा पराभवही स्वीकारावा लागला होता. आता याच दौऱ्याचा पुढील टप्पा यंदा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात पार पडणार आहे. सुरुवातीला पर्थ, ॲडलेड आणि सिडनी इथं एकदिवसीय सामने होतील. त्यानंतर ५ टी-२० सामने खेळवले जातील. (Ind vs Aus, T-20, ODI Series)

या दौऱ्याचा कार्यक्रम पाहूया,
ऑस्ट्रेलिया वि. भारत एकदिवसीय मालिका (ऑक्टोबर २०२५)
  • १९ ऑक्टोबर – पर्थ स्टेडिअम, पर्थ (दिवसरात्र)
  • २३ ऑक्टोबर – ॲडलेड ओव्हल, ॲडलेड (दिवसरात्र)
  • २५ ऑक्टोबर – एससीजी, सिडनी (दिवसरात्र)

(हेही वाचा – IPL 2025, MI vs KKR : मुंबईविरुद्ध सुनील नरेन खेळणार की नाही, प्रशिक्षकांनी केलं स्पष्ट)

ऑस्ट्रेलिया वि. भारत टी-२० मालिका (ऑक्टोबर – नोव्हेंबर २०२५)
  • २९ ऑक्टोबर – मनुका ओव्हल, कॅनबेरा
  • ३१ ऑक्टोबर – एमसीजी, मेलबर्न
  • २ नोव्हेंबर – बेलिराईव्ह ओव्हल, होबार्ट
  • ६ नोव्हेंबर – गोल्ड कोस्ट स्टेडिअम, गोल्ड कोस्ट
  • ८ नोव्हेंबर – गॅब्बा, ब्रिस्बेन

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.