-
ऋजुता लुकतुके
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या (Ricky Ponting) मते पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सध्याचा ऑसी संघच बोर्डर – गावसकर चषकाचा मानकरी ठरेल. भारताविरुद्धची ५ सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलियन संघ ३-१ ने जिंकेल, असंही भाकीत त्याने वर्तवलं आहे. या आधी ऑस्ट्रेलियात झालेल्या दोन कसोटी मालिकांमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला आहे. पण, यावेळी चित्र पालटेल, असं पाँटिंगला वाटतं. (Ind vs Aus, Test Series)
(हेही वाचा- Ashwini Ponnappa : साईने कागदोपत्री जाहीर केलेली मदत मिळालीच नव्हती; बॅडमिंटनपटू अश्विनी पोनप्पाचा दावा)
२२ नोव्हेंबरपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेला सुरुवात होईल. या आधीच्या दोन मालिकांमध्ये भारतीय संघाने २-१ असा विजय मिळवला आहे. त्यामुळे मागची तीन वर्षं बोर्डर – गावसकर चषक भारताकडे आहे. ‘आगामी मालिका चुरशीची होणार एवढं नक्की. या आधीच्या दोन मालिकांमधील ऑस्ट्रेलियन संघाची कामगिरी पाहता, यावेळी विजय पॅट कमिन्सच्या संघाचा होईल, याची खात्री वाटते,’ असं पाँटिंग आयसीसी रिव्ह्यू या नियतकालीकाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला आहे. (Ind vs Aus, Test Series)
कसोटी मालिका ५ सामन्यांची होतेय यावरही त्याने समाधान व्यक्त केलं. ‘या आधीच्या दोन मालिका चार सामन्यांच्या झाल्या. पाच सामने असतील तर मजा येते. तुमची कसोटीही लागते. कारण, मालिका कमी सामन्यांची असेल तर एखादी बरोबरी आणि पावसाचा खेळखंडोबा यातच मालिका संपून जाते. ५ कसोटींच्या मालिकेत स्पर्धा रंगतदार होते. आणि निकालही लागतो,’ असं पाँटिंग म्हणाला. (Ind vs Aus, Test Series)
(हेही वाचा- Independence Day: स्वातंत्र्य दिनानिमित्त हाय अलर्ट! दिल्ली, पंजाबमध्ये आत्मघाती हल्ल्याची माहिती)
भारतीय संघ बोर्डर – गावसकर चषक सुरू झाल्यापासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाच कसोटींची मालिका खेळलेला नाही. १९९१-९२ मध्ये भारतीय संघ शेवटची ५ कसोटींची मालिका ऑस्ट्रेलियात खेळला आहे. यात भारताचा ०-४ ने पराभव झाला होता. (Ind vs Aus, Test Series)
रिकी पाँटिंग आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. या संघातील खलिल अहमदचा भारतीय संघात समावेश झाला आहे. त्याबद्दल त्याने समाधान व्यक्त केलं. (Ind vs Aus, Test Series)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community