-
ऋजुता लुकतुके
टी-२० महिला विश्वचषकाच्या आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताचा ९ धावांनी निसटता पराभव झाला. विजयासाठी १५३ धावांची गरज असताना भारतीय संघ ९ बाद १४२ वर अडखळला. भारतीय संघाचा हा शेवटचा साखळी सामना होता. या पराभवामुळे भारतीय महिलांचं उपांत्य फेरीचं गणित थोडं कठीण झालंय. सोमवारी न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान या सामन्यानंतरच आता भारतीय संघाचं भवितव्य ठरेल. (Ind vs Aus, Women’s T20 WC)
(हेही वाचा- E-Shivai Bus: एसटीच्या ताफ्यात लवकरच १०० नव्या ई-शिवाई बसेस येणार; ‘या’ मार्गांवर बस धावणार)
शारजा क्रिकेट स्टेडिअमवर नाणेफेक ऑस्ट्रेलियाने जिंकली आणि पहिली फलंदाजी घेतली. सलामीवीर ग्रेस हॅरिसने ४० धावा करत ऑस्ट्रेलियन संघासाठी चांगली सुरूवात करून दिली. पण, बाकी मधळी फळी गडगडली. पंधराव्या षटकात त्यांची अवस्था ५ बाद १०१ अशी होती. पण, कर्णधार ताहलिया मॅकग्रा (Tahlia McGrath) (३२) आणि एलिस पेरी (Ellyse Perry) (३२) यांनी ऑस्ट्रेलियन डावाला आकार दिला. निर्धारित २० षटकांत त्यांनी ८ बाद १५१ धावा केल्या. भारतीय संघानेही चांगली टक्कर दिली. कर्णधार हरमनप्रीतने (Harmanpreet Kaur) नाबाद ५१ धावा केल्या. पण, शेवटच्या षटकांत १४ धावा करायच्या असताना भारतीय संघाने ३ बळीही गमावले. धावा जेमतेम ४ झाल्या. तिथे भारताचा पराभव झाला. (Ind vs Aus, Women’s T20 WC)
A valiant knock from Captain Harmanpreet Kaur 👏👏#TeamIndia came close to the target but it’s Australia who win the match by 9 runs in Sharjah.
📸: ICC
Scorecard ▶️ https://t.co/Nbe57MXNuQ#T20WorldCup | #INDvAUS | #WomenInBlue pic.twitter.com/jBJJhjSzae
— BCCI Women (@BCCIWomen) October 13, 2024
भारतीय संघासाठी आता उपांत्य फेरीचं गणित थोडंसं किचकट झालंय. ए गटात आता ऑस्ट्रेलियाचा संघ ८ गुणांसह अव्वल आहे. त्यांनी निर्विवाद उपांत्य फेरी गाठली. तर भारतीय संघाचे आता २ सामन्यातून ४ गुण झाले आहेत. तर न्यूझीलंडचे ३ सामन्यांतून ४ गुण झाले आहेत. सोमवारी त्यांचा शेवटचा सामना पाकिस्तानशी आहे. हा सामना त्यांनी जिंकला तर ६ गुणांसह ते उपान्त्य फेरीत पोहोचतील. त्यांचा पराभव झाला तरंच भारताला सरस धावगतीच्या आधारे उपांत्य फेरीची संधी असेल. सोमवारचा सामना बरोबरीच सुटला किंवा अनिर्णित राहिला तरी न्यूझीलंड भारताच्या पुढे जातील. सोमवारचा सामना पाकिस्तानी महिलांनी जिंकला तर त्यांना तो खूप मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. तरंच उपांत्य फेरीची आशा धरता येईल. (Ind vs Aus, Women’s T20 WC)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community