भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind vs Aus, World Cup Final) यांच्या दरम्यान आज रविवारी आयसीसी वर्ल्ड कपसाठी अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत आहे. या मैदानावर आतापर्यंत वर्ल्डकपमधील चार सामने खेळले गेले असून आजवर २८६ ही सर्वोच्च धाव संख्या ठरली आहे. त्यामुळे या मैदानावर आजवर कुणालाही तिनशेच्या पार धावसंख्या उभारता आलेली नाही. तसेच आधीच्या तीन सामन्यांमध्ये प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारणाऱ्या संघाने विजय मिळवलेला आहे. त्यामुळे या मैदानाचा इतिहास लक्षात घेता भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतल्यास अर्धी लढाई जिंकल्यासारखे होईल, परंतु भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याची वेळ आलीच तर संघाला एकूण साडेतीनशे धावांचा डोंगर रचावा लागणार आहे. तरच भारताच्या विजयाचा मार्ग सुकर ठरेल,असे आकडेवारींवरून स्पष्ट होते.
यापूर्वी या मैदानावर झालेल्या लढतींवर नजर टाकल्यास तीन वेळा प्रथम क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा विजय झाला आहे. आणि ऑस्ट्रेलिया व इंग्लंड विरुध्दचा सामना याला अपवाद राहिला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने २८६ धावांचे लक्ष्य इंग्लंड संघापुढे ठेवले होते. त्याचा पाठलाग करताना इंग्लंड संघ ४८ षटकांत २५३ धावांमध्ये गारद झाला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलिया हा एकमेव संघ आहे ज्याने या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना विजय मिळवला होता.
विशेष म्हणजे न्यूझीलंडच्या कॉनवे १५२ धावा आणि रचित रविंद्र याने १२३ धावा करत शतकांची नोंद याच मैदानावर केलेली आहे. पण या दोघांना वगळता कुठल्याही संघाच्या फलंदाजाला या खेळपट्टीवर शतकांची मोहर उमटवता आलेली नाही. अफगाणिस्तानचा अझमतुल्ला हा ९७ धावांवर नाबाद राहिला होता, पण त्याला शतक पूर्ण करता आले नव्हते. त्यामुळे दोन्ही संघाच्या खेळाडुंची या मैदानावर शतक करण्याची इच्छा असेल.
भारतीय संघासाठी नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी पुरक असून पाकिस्तान विरुध्दच्या सामन्यात भारतीय संघाने त्यांना १९१ धावांवर रोखले होते आणि तीन गडी गमावत १९२ धावांचे लक्ष्य पूर्ण करत विजय मिळवला होता. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघाचे सर्व गोलंदाज प्रभावी ठरले होते. या सामन्यात बुमराह, सिराज, हार्दीक, कुलदीप आणि जडेजा यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले होते. तर फलंदाजीमध्ये रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी प्रभावी फलंदाजी केली होती.
(हेही वाचा-Ind vs Aus T20 Series : भारतीय संघाच्या कर्णधारपदी सुर्यकुमार यादव?)
मात्र, दोन्ही संघातील गोलंदाजीचा विचार करता ज्याप्रमाणे भारतीय संघाचे सर्व गोलंदाज पाक विरोधातील सामन्यात प्रभावी ठरले होते, त्याच प्रमाणे इंग्लंड विरोधातील सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या मायकल स्टार्क, हेजलवूड, पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी दोन तर ऍडम झम्पाने तीन आणि स्टॉयनिसने एक बळी मिळवला होता.
या मैदानावर भारतीय गोलंदाजी प्रमुख अस्त्र बनलेला मोहम्मद शमी हा प्रथम खेळत आहे. शमी हा फार्मात आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाजी मजबूत आहे. त्यामुळे कुलदीप आणि जडेजा यांची डोकदुखी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना असेल. तर ऑस्ट्रेलियाच्या जलदगती गोलंदाजांना सुरुवातीला सावध खेळतानाच फिरकी गोलंदाज ऍडम झम्पा आणि मॅक्सवेल यांनाही सांभाळून खेळण्याची गरज भासणार आहे.
मात्र, फलंदाजीचा विचार करता या मैदानावर रोहिम शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी धावा कुटल्या आहेत, तसेच ऑस्ट्रेलियाचे स्ट्रिव्ह स्मिथ, लाबूसेन, ग्रीन यांनीही धावा बऱ्यापैंकी केल्या आहेत. भारतीय संघाकडून सध्या विराट कोहली, शुभम गिल, के एल राहुल हे फार्मात आहे. त्यामुळे त्यांना सुरुवातीला बाद करण्याची ऑस्ट्रेलियन संघाची रणनिती असेल, तर ऑस्ट्रेलियाच्या सुरुवातीचा संघ ढेपाळला तरी कमिन्सला सोबत घेऊन मॅक्सवेल यांनी एकहाती सामना फिरवत दोनशे एक धावांची विक्रमी खेळी केली होती. मॅक्सवेलला कशाप्रकारे बाद करायचे आणि कुठले अस्त्र बाहेर काढायचे हे रोहिम शर्मा आणि चमुला माहित असले तरी अंतिम सामना असल्याने सर्वांवरच याचे मोठे दडपण असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मैदानाचा विचार करता दोन्ही संघाची गोलंदाजांची बाजू मजबूत असून आता किती धावांचे लक्ष्य उभे केले जाते यावर विजयाचा मार्ग दिसला जाणार आहे. दोन्ही संघ तुल्यबळ असले तरी सध्याचा भारतीय संघ फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात नंबर वन असल्याने त्यांना आता जगज्जेता आपणच आहोत हे सिध्द करण्यासाठी या वर्ल्डकपवर आपले नाव कोरावेच लागणार आहे.
इंग्लंड विरुध्द न्यूझीलंड
इंग्लंड : २८२/ ९
न्यूझीलंड : २८३/ १
न्यूझीलंड संघाने ९ गडी राखत मिळवला विजय
भारत विरुध्द पाकिस्तान
पाकिस्तान : १९१/ १०
भारत : १९२ /३
भारतीय संघाने सात गडी राखत मिळवला विजय
ऑस्ट्रेलिया विरुध्द इंग्लंड
ऑस्ट्रेलिया : २८६ /१०
इंग्लंड : २५३ /१०
ऑस्ट्रेलिया संघ ३३ धावांनी विजयी
अफगाणिस्तान विरुध्द दक्षिण आफ्रिका
अफगाणिस्तान : २४४/१०
दक्षिण आफ्रिका : २४७/५
दक्षिण आफ्रिका संघ ५ गडी राखून विजयी
हेही पहा-
Join Our WhatsApp Community