ऋजुता लुकतुके
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात, आयसीसीने भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यासाठी (Ind vs Aus, World Cup Final) मैदानावरील पंचांची नावं जाहीर केली आहेत. रिचर्ड इलिंगवर्थ आणि रिचर्ड केटलबरो यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अंतिम सामन्यात पंच म्हणून उभं राहण्याची केटलबरो यांची ही दुसरी खेप असेल. यापूर्वी २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या स्पर्धेत मेलबर्नच्या एमसीजी मैदानावर त्यांनी पहिल्यांदा ही जबाबदारी पेलली होती.
इलिंगवर्थ आणि केटलबरो यांनी २००९ च्या नोव्हेंबर महिन्यात आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात पंच म्हणून काम पाहायला सुरुवात केली. आणि दोघांकडे ५० हून जास्त सामन्यांचा अनुभव आहे. आताही स्पर्धेच्या उपान्त्य सामन्यात दोघंही पंच होते. इलिंगवर्थ यांनी मुंबईतल्या भारत वि. न्यूझीलंड सामन्यात पंच म्हणून काम पाहिलं. तर केटलबरो यांनी कोलकात्याला झालेल्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात सेवा बजावली.
(हेही वाचा-World Cup 2023 Final : गुगलने खास ‘डुडल’ बनवून भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाला दिल्या शुभेच्छा)
या दोघांबरोबरच जोएल विल्सन हे तिसरे पंच असतील. तर ख्रिस गॅफनी चौथे पंच म्हणून काम पाहतील. सामनाधिकारी असतील अँडी पायक्रॉफ्ट. हे सर्व आयसीसीच्या ज्येष्ट गटातील पंच आहेत. आणि आताही सर्वांनी उपान्त्य सामन्यातही जबाबदारी निभावली आहे.
सामना – भारत वि. ऑस्ट्रेलिया विश्वचषक अंतिम सामना
सामनाधिकारी – अँडी पायक्रॉफ्ट
मैदानी पंच – रिचर्ड इलिंगवर्थ, रिचर्ड केटलबरो
तिसरे पंच – जोएल विल्सन
चौथे पंच – ख्रिस गॅफनी
हेही पहा-
Join Our WhatsApp Community